advertisement

५० हजार लाच मागितली, २० हजारांवर तडजोड, ACB ने रंगेहात पडकलं, तहसीलदारांना दणका

Last Updated:

सॉल्वन्सी प्रमाणपत्र काढण्यासाठी परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी ५० हजारांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

परळी तहसीलदार
परळी तहसीलदार
बीड : राज्यभरात शासकीय अधिकाऱ्यांच्या लाचेची प्रकरणे गाजत असताना बीडमधील परळीच्या तहसीलदारांना देखील लाच घेतल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. चिठ्ठीवर आकडा लिहून त्यांनी तक्रारदाराकडे लाच मागितल्याचा आरोप आहे.
सॉल्वन्सी प्रमाणपत्र काढण्यासाठी परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी ५० हजार रूपये लाखेची मागणी करून 20 हजारात तडजोड केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तहसीलदारांना अटक केली.

आधी ५० हजारांची लाच मागितली, नंतर २५ आकडा लिहिला, अन् मग...

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर पडताळणीवेळी व्यंकटेश मुंडे यांनी चिठ्ठीवर लाचेचे 50, नंतर 25 असे आकडे लिहून लाच मागितल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, तक्रारदाराने वीस हजार देतो म्हणल्यानंतर अजून तीन टाका असे म्हणत 23 हजारांची मागणी केली.
advertisement

सापळा लावून रंगेहात पकडले, तहसीलदारांविरोधात गुन्हा

यानंतर तीन वेळा लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता. मात्र संशय आल्याने मुंडे यांनी लाच स्वीकारली नाही. मात्र लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने काल त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

नांदेडच्या घरावर छापा, १३ तोळे सोने जप्त

दरम्यान, तहसीलदार मुंडे यांना ताब्यात घेतल्यानंतर एसीबीने त्यांच्या नांदेड येथील यशोविहार भागातील घराची झाडाझडती घेतली. या घरातून पोलिसांनी 13 तोळे सोने आणि 55 हजार रूपये जप्त केल्याची माहिती आहे. या आधीच एसीबीने त्यांच्या जवळील साधारण 80 हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त केले होते.
advertisement

कारवाईचा संशय आला, त्यामुळे लाच घेतलीच नाही पण....

बीडच्या परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच मागितल्याच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. मुंडे यांनी 50 हजार रुपयाची लाच मागत 20 हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल केले होते. कारवाईचा संशय आल्याने त्यांनी पैसे स्वीकारले नसले तरी पैसे मागितलेले असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आता या कारवाईनंतर तहसील परिसरात उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी फटाके फोडत आतिषबाजी केली. कनेरवाडी येथील हनुमंत फड यांनी मी गेल्या तीन वर्षापासून माझ्या शेताच्या रस्त्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु तो झाला नव्हता. असे अधिकारी कामच करत नाहीत. परळीत अनेक ठिकाणी असेच प्रकार सुरू आहे. पुढारी सांगतील त्याचेच काम होत आहे. हा सगळा मनमानी कारभार थांबला पाहिजे, अशी अपेक्षा देखील फड यांनी व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
५० हजार लाच मागितली, २० हजारांवर तडजोड, ACB ने रंगेहात पडकलं, तहसीलदारांना दणका
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement