advertisement

सावधान! किचनमध्ये 'या' वस्तू ठेवण्यापूर्वी करा विचार, तुमची एक चूक पडेल महागात; होईल मोठं नुकसान

Last Updated:
वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक कोपरा अत्यंत महत्वाचा असतो. वास्तुशास्त्रानुसार घरात काही विशिष्ट वस्तू ठेवल्याने जीवनात अडथळे आणि अडचणी निर्माण होतात.
1/7
वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक कोपरा अत्यंत महत्वाचा असतो. वास्तुशास्त्रानुसार घरात काही विशिष्ट वस्तू ठेवल्याने जीवनात अडथळे आणि अडचणी निर्माण होतात. अशा वेळेस काही गोष्टी घरातून आणि घरातील महत्वाचा भाग असलेल स्वयंपाकघरातून दूर ठेवणे महत्वाचे असते.

2/7
वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघर हे केवळ अन्न बनवण्याचे ठिकाण नसून ते घरातील सकारात्मक उर्जेचे केंद्र मानले जाते. किचनमध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो, असे म्हटले जाते. त्यामुळे किचनची मांडणी करताना वास्तूच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा आपण सोयीसाठी किचनमध्ये अशा काही वस्तू ठेवतो, ज्या वास्तू दोषाला कारणीभूत ठरतात.

3/7
औषधे: अनेकांना किचनमध्ये औषधे ठेवण्याची सवय असते, जेणेकरून ती वेळवर घेता येतील. वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये औषधे ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. औषधे ही आजाराचे प्रतीक आहेत, तर किचन हे आरोग्याचे. औषधे किचनमध्ये ठेवल्याने घरातील सदस्य वारंवार आजारी पडू शकतात आणि औषधांवरील खर्च वाढतो.

4/7
आरसा: किचनमध्ये आरसा लावणे वास्तूच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक मानले जाते. आरसा ऊर्जेचे प्रतिबिंब दाखवतो. गॅस शेगडीचे प्रतिबिंब आरशात दिसणे म्हणजे आगीची तीव्रता दुप्पट होण्यासारखे आहे. यामुळे घरातील सदस्यांमध्ये राग आणि चिडचिडेपणा वाढतो आणि अपघाताची भीती राहते.

5/7
तुटलेली किंवा फुटलेली भांडी: काही लोक थोडासा तडा गेलेली भांडी फेकून न देता वापरत राहतात. तुटलेली भांडी गरिबीला आमंत्रण देतात. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आर्थिक उत्पन्नात अडथळे येतात. अशी भांडी त्वरित घरातून बाहेर काढावीत.

6/7
कचरापेटी: सोयीसाठी काही लोक किचनच्या ओट्याखाली किंवा कोपऱ्यात डस्टबिन ठेवतात. किचनमध्ये कचरा साठवणे किंवा उघडी डस्टबिन ठेवणे हे राहू दोषाला कारणीभूत ठरते. यामुळे अन्नाची शुद्धता कमी होते आणि घरात दारिद्र्य येते. डस्टबिन नेहमी झाकणासह किचनच्या बाहेर किंवा बाल्कनीत ठेवावे.

7/7
शिळी कणिक: अनेक गृहिणी उरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी वापरतात. फ्रिजमध्ये ठेवलेली शिळी कणिक नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते. यामुळे घरातील लोकांमध्ये आळस वाढतो आणि मानसिक तणाव निर्माण होतो. नेहमी ताजी कणिक मळूनच स्वयंपाक करावा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement