advertisement

खान सरांनी का सोडलं 1000 एकर युनिव्हर्सिटीचं स्वप्न? बिहारमध्ये नेमकं असं काय घडलं की विकत घेतलेली जमीन विकावी लागतेय?

Last Updated:

एकेकाळी ज्या जमिनीवर खान सर एक भव्य 'हायटेक युनिव्हर्सिटी' उभारणार होते, आता तीच जमीन त्यांना विकावी लागत आहे. हे का घडलं? खान सरांना नक्की कुणी 'टॉर्चर' केलं? आणि आता पुढे काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

खान सर
खान सर
मुंबई : बिहारमधील प्रसिद्ध शिक्षक 'खान सर' यांचं नाव घेतलं की, डोळ्यांसमोर येतो तो हजारो विद्यार्थ्यांचा गराडा आणि कठीण विषय सोपा करून सांगण्याची त्यांची अजब शैली. केवळ बिहारच नाही, तर संपूर्ण देशातील तरुणांसाठी खान सर हे एक 'आयकॉन' आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून खान सर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. त्यांचं एक मोठं स्वप्न, ज्याने बिहारच्या शैक्षणिक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला असता, ते सध्या एका धक्कादायक वळणावर येऊन थांबलं आहे.
एकेकाळी ज्या जमिनीवर खान सर एक भव्य 'हायटेक युनिव्हर्सिटी' उभारणार होते, आता तीच जमीन त्यांना विकावी लागत आहे. हे का घडलं? खान सरांना नक्की कुणी 'टॉर्चर' केलं? आणि आता पुढे काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
खान सरांना बिहारमधील कोईलवर भागात एक जागतिक दर्जाची युनिव्हर्सिटी उभारायची होती. पाटण्याजवळ असलेल्या या जागेची कनेक्टिव्हिटी उत्तम असल्याने, त्यांनी 1000 एकर जमीन घेण्याचा आराखडा तयार केला होता. हे केवळ एक कॉलेज नसून, एक स्वावलंबी 'कॅम्पस' असणार होतं.
advertisement
25 हजार विद्यार्थ्यांची राहण्याची सोय
हायटेक सुविधा: स्वतःची वीज निर्मिती करणारी यंत्रणा (Solar/Power system).
प्रॅक्टिकल लर्निंग: एमबीएच्या विद्यार्थ्यांनी चालवलेले मॉल, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष बिझनेस अनुभव मिळेल.
खान सरांनी अनेक जमीन मालकांशी चर्चा करून मार्केट रेटपेक्षा जास्त किमतीत व्यवहार ठरवले होते. 10-15 एकर जमिनीची नोंदणी (Registry) सुद्धा झाली होती. पण, जशी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की, "खान सर इथे मोठी युनिव्हर्सिटी काढणार आहेत", तशी परिस्थिती बदलली.
advertisement
खान सरांचा आरोप आहे की, ही बातमी समजताच काही जमीन मालकांनी जमिनीचे दर 10 पटीने वाढवले. ज्यांनी ॲडव्हान्स घेतला होता, त्यांनीही ऐनवेळी रजिस्ट्री करण्यास नकार दिला. खान सर दुखी अंतःकरणाने सांगतात की, "जमीन मालकांनी माझ्या मजबुरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. इतका मानसिक त्रास दिला गेला की, शेवटी मला तिथे युनिव्हर्सिटी उभारण्याचा विचार सोडून द्यावा लागला."
advertisement
आता 'ती' जमीन का विकावी लागतेय?
परिस्थिती इतकी गुंतागुंतीची झाली की, 1000 एकरचं लक्ष गाठणं आता अशक्य झालं आहे. थोड्या जमिनीवर एवढा मोठा प्रकल्प उभा राहू शकत नाही. त्यामुळे खान सरांनी आता कोईलवरमधील विकत घेतलेली जमीन विकण्याचा आणि तिथून आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.
कोईलवरचा प्लॅन फसला असला, तरी खान सरांनी स्पष्ट केलंय की त्यांचं युनिव्हर्सिटीचं स्वप्न संपलेलं नाही. आता ते दुसऱ्या ठिकाणी हा प्रकल्प शिफ्ट करत आहेत. पण यावेळी त्यांनी एक मोठी खबरदारी घेतली आहे:
advertisement
1. गुपित लोकेशन: नवी युनिव्हर्सिटी कुठे होणार, याची भनकही कोणाला लागू दिली जाणार नाही.
2. रजिस्ट्रीची नवी पद्धत: यावेळी जमीन थेट खान सरांच्या नावाने न घेता, वेगवेगळ्या लोकांच्या नावाने घेतली जाईल.
3. नंतर ट्रान्सफर: जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ती अधिकृतपणे खान सरांच्या नावे ट्रान्सफर केली जाईल. जरी यामुळे नोंदणीचा खर्च वाढणार असला, तरी प्रोजेक्टमध्ये कोणाचीही अडवणूक होणार नाही, याची खात्री सरांनी दिली आहे.
advertisement
थोडक्यात सांगायचे त एखाद्या चांगल्या कामात अडथळे येतातच, पण खान सरांनी घेतलेला हा माघार घेण्याचा निर्णय, प्रत्यक्षात एका मोठ्या भरारीची तयारी आहे. बिहारच्या मातीत एक जागतिक दर्जाची युनिव्हर्सिटी उभी राहावी, ही जिद्द मात्र अजूनही कायम आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
खान सरांनी का सोडलं 1000 एकर युनिव्हर्सिटीचं स्वप्न? बिहारमध्ये नेमकं असं काय घडलं की विकत घेतलेली जमीन विकावी लागतेय?
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement