Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; संयमाची परीक्षा, पण अडचणीतूनच..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सर्व राशींसाठी संमिश्र परिणाम घेऊन येणार आहे. काही राशींना कठोर परिश्रमानंतर यश मिळेल, तर काहींना संयम आणि सतर्कता बाळगावी लागेल. काही राशीच्या लोकांना कामाचा ताण, मानसिक ओढाताण, विरोधकांचा त्रास आणि आर्थिक दबाव जाणवू शकतो. अडचणींनंतर काही राशींच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल, ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ जाणून घेऊ.
सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक असेल. तुमच्या आसपास असे काही लोक असतील जे तुमच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे सावध राहा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या कामाकडे दुर्लक्ष करू नका. रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा जवळची नाती दुरावू शकतात. जुना आजार पुन्हा डोके वर काढू शकतो, त्यामुळे वेळेवर औषधे घ्या. आर्थिक बाबतीत कोणालाही कर्ज देऊ नका, कारण ते पैसे परत मिळण्यास अडचण येईल.
advertisement
advertisement
advertisement
तूळ - तूळ राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपल्या हितशत्रूंपासून लांब राहावे. नोकरीत आपले गुपित कोणाशीही शेअर करू नका. जरी तुम्हाला सध्याच्या कामात समाधान वाटत नसले, तरी घाईने राजीनामा देऊ नका. आठवड्याच्या शेवटी होणारा प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. कायदेशीर प्रकरणांमध्ये निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये सुसंवाद राहील. नवीन विवाहितांना कुटुंबाकडून आनंदाची बातमी मिळू शकते.
advertisement
advertisement










