advertisement

Video : दारू प्यायचीच असेल तर अशा प्रकारे प्या; आरोग्यासाठी कमी नुकसानकार, तज्ञांनी दिली महत्त्वाची टिप

Last Updated:

अल्कोहोल हे आरोग्यासाठी अपायकारकच आहे, पण जर तुम्ही ते घेणारच असाल, तर शरीराचे किमान नुकसान व्हावे यासाठी काही शास्त्रीय नियम पाळणे गरजेचे आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : बदलत्या काळात पार्टी आणि सोशल ड्रिंकिंग हे शहरी जीवनशैलीचा एक भाग बनले आहे. मित्र-मैत्रिणींचे गेट-टुगेदर असो किंवा ऑफिसची पार्टी, अनेकदा मद्यप्राशन केले जाते. मात्र, या आनंदाच्या दुसऱ्याच दिवशी डोकेदुखी, मळमळ आणि शरीरात जाणवणारा प्रचंड गळवा पूर्ण दिवसाचे नियोजन कोलमडवून टाकतो. यात सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे आपल्या 'लिव्हर'च्या आरोग्याची.
अल्कोहोल हे आरोग्यासाठी अपायकारकच आहे, पण जर तुम्ही ते घेणारच असाल, तर शरीराचे किमान नुकसान व्हावे यासाठी काही शास्त्रीय नियम पाळणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या डॉ. प्रिया दांडगे यांनी अलीकडेच काही अशा टिप्स शेअर केल्या आहेत, ज्यामुळे मद्याचा शरीरावर होणारा 'घातक' परिणाम कमी होऊ शकतो.
1. डिहायड्रेशन रोखण्यासाठी 'वन-इस्टू-वन' फॉर्म्युला
दारू शरीरात गेल्यावर सर्वात आधी पाण्याचे प्रमाण कमी करते, ज्याला आपण 'डिहायड्रेशन' म्हणतो. हँगओव्हरचे हे मुख्य कारण आहे.
advertisement
दारूचा एक ग्लास पिऊन झाला की लगेच एक ग्लास पाणी प्यावे. दोन पेगच्या मध्ये पाणी पिणे गरजेचं आहे, यामुळे शरीर हायड्रेट राहते. यामुळे दुसऱ्या दिवशी होणारी डोकेदुखी आणि थकवा 70 ते 80 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
2. रिकाम्या पोटी पेग घेण्याची चूक टाळा
अनेकजण घाईघाईत किंवा रिकाम्या पोटी दारू पितात, ज्यामुळे अल्कोहोल थेट आणि वेगाने रक्तामध्ये शोषले जाते.
advertisement
काय करावे? दारु पिण्यापूर्वी काहीतरी पौष्टिक पदार्थ खावेत. पोट भरलेले असल्यास अल्कोहोल शोषण्याचा वेग मंदावतो. परिणामी, यकृतावर (Liver) एकाएकी ताण येत नाही आणि नशेचा अंमलही नियंत्रणात राहतो.
3. 'चखणा' बदला, लिव्हर सुरक्षित ठेवा
सहसा दारू म्हटलं की आपण वेफर्स, तळलेले पदार्थ किंवा मसालेदार गोष्टी खातो. पण हेच तुमच्या लिव्हरसाठी सर्वात जास्त हानिकारक ठरते.
advertisement
डॉ. दांडगे सुचवतात की, दारू पिताना किंवा त्यापूर्वी प्रोटिनयुक्त पदार्थ खावेत.
काय खावे? लो-फॅट पनीर, चीज, मोड आलेली कडधान्ये, उकडलेले किंवा ग्रील्ड चिकन. हे प्रोटिन लिव्हरसाठी एखाद्या 'बॉडीगार्ड'प्रमाणे काम करते आणि अल्कोहोलचा थेट परिणाम कमी करते.
advertisement
4. पार्टीनंतरच्या जड जेवणाला करा 'नाही'
अनेकदा लोक मद्यप्राशन करून झाल्यावर खूप जास्त कॅलरी असलेले किंवा तेलकट जेवण करतात. आधीच दारूमुळे ताणाखाली असलेल्या पचनसंस्थेवर हे जड जेवण अधिक भार टाकते. त्यामुळे पार्टीनंतर शक्यतो हलके अन्न घेण्याचा प्रयत्न करा.
(टीप: हा लेख केवळ माहितीसाठी आहे. मद्यपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. वरील टिप्स केवळ होणारा अपाय कमी करण्यासाठी सुचवण्यात आल्या आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Video : दारू प्यायचीच असेल तर अशा प्रकारे प्या; आरोग्यासाठी कमी नुकसानकार, तज्ञांनी दिली महत्त्वाची टिप
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement