पण एकनाथ शिंदे यांच्या दबावतंत्राला फारसं यश मिळालं नसल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचाच महापौर होणार असल्याचं आता कन्फर्म झाल्याची माहिती आहे. शिवाय मुंबईचा महापौर शपथ कधी घेणार? याची माहिती देखील समोर आली आहे. भाजपच्या एका बड्या नेत्यानं दिल्लीतील अनौपचारिक गप्पांमध्ये याबाबतचा खुलासा केला आहे.
भाजपच्या नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा महापौर ३० जानेवारीला शपथ घेण्याची शक्यता आहे. २२ जानेवारीला महापौर पदाची आरक्षण सोडत निघणार आहे. यानंतर ही जागा नेमकी कोणत्या प्रवर्गाला सुटते, ते बघून पुढील आठवडाभरात महापौर पदाचा चेहरा निवडला जाणार आहे. त्यानंतर ३० तारखेपर्यंत महापौराचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
advertisement
येत्या दोन दिवसांत महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकाचं शक्तिप्रदर्शन करत एकत्र नोंदणी कोकण भवन येथे होणार आहे. कोकण भवन येथील नगर विकास मंत्रालयाच्या कार्यालयात भाजप आणि शिवसेनेचे विजयी नगरसेवक एकत्र पक्ष गट स्थापनेची अधिकृत नोंदणी करणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यावर शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत.
