TRENDING:

Rajya Sabha Election Sharad Pawar: शरद पवारांच्या उमेदवारीवर भाजप टाकणार डाव, महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ, काय आहे 'गेम प्लॅन'?

Last Updated:

Rajya Sabha Electon Sharad Pawar: राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच आता भाजप-महायुती मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीच्या ६ जागा निश्चित असून सातवी जागा महाविकास आघाडी जिंकू शकते. या सातव्या जागेवरून महाविकास आघाडीत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच आता भाजप-महायुती मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे या निवडणुकीत २०२२ मधील निवडणुकीची पुनरावृत्ती होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शरद पवारांच्या उमेदवारीवर भाजप टाकणार डाव, महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ, काय आहे 'गेम प्लॅन'?
शरद पवारांच्या उमेदवारीवर भाजप टाकणार डाव, महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ, काय आहे 'गेम प्लॅन'?
advertisement

शरद पवारांसाठी भाजपची खास रणनीती...

भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी 'न्यूज १८ मराठी'ला दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडून जर स्वतः शरद पवार उमेदवार असतील, तरच महायुती ही निवडणूक बिनविरोध करण्यास संमती देऊ शकते. मात्र, पवारांऐवजी मविआने दुसरा कोणताही चेहरा समोर आणला, तर भाजप सातवी जागा लढवण्यावर ठाम आहे. ७ व्या जागेसाठी महायुतीला मतांची जुळवाजुळव करावी लागेल, मात्र भाजपने त्यासाठी कंबर कसली आहे.

advertisement

भाजप २०२२ चा गेम प्लॅन टाकणार?

महायुतीने ७ वी जागा लढवल्यास २०२२ मधील राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. त्यावेळी संख्याबळ विरोधात असतानाही भाजपने अतिरिक्त जागा जिंकून महाविकास आघाडीला धक्का दिला होता. त्याच यशस्वी इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची रणनीती भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत आखली जात आहे.

advertisement

महायुती आणि भाजपचे जागावाटप

राज्यसभेच्या एकूण ७ जागांपैकी गणिते खालीलप्रमाणे मांडली जात आहेत. त्यापैकी भाजप ४ जागा, शिवसेना शिंदे गट, अजित पवार गटाला प्रत्येकी एक-एक जागांवर विजय मिळवता येईल. तर, महाविकास आघाडीला एका जागेवर विजय मिळवता येईल, एवढं संख्याबळ आहे.

उमेदवारांबाबत आज मोठा फैसला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ऊन तापलंय अन् थंड प्यायचंय? 5 मिनिटांत बनवा चिकू शेक, सोपी अन् हेल्दी रेसिपी Vid
सर्व पहा

आज होणाऱ्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत ७ व्या जागेबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. रामदास आठवले यांची एक जागा जवळपास निश्चित मानली जात आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एका राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या नेत्याला महाराष्ट्रातून संधी मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित २ जागांसाठी राज्यातीलच सक्षम नेत्यांची निवड केली जाणार आहे. आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजप आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्याची चिन्हे आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rajya Sabha Election Sharad Pawar: शरद पवारांच्या उमेदवारीवर भाजप टाकणार डाव, महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ, काय आहे 'गेम प्लॅन'?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल