उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, (उद्धव ठाकरे) ते डायलॉग मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत. मुख्यमंत्री असताना घरात बसून काम केलं. आणि 600 कोटींचा मुख्यमंत्री साहाय्यता निधी वापरला नाही. मराठवाड्यातील आपत्तीचे गांभीर्य तिन्ही नेत्यांना आहे.त्यामुळे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत करताय. पण तुम्ही पिकनिक करण्यासाठी गेलात.शेतकऱ्यांच्या प्रति तुमचं प्रेम पुतणा मावशीसारखं आहे,अशा शब्दात दरेकर यांनी ठाकरे यांना चिमटा काढला.
advertisement
उद्धव ठाकरेंना शेतीतील काही समजत नाही.ते स्वतः ही मान्य करतात. ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते,त्यांनी प्रशासन कधीच समजून घेतलं नाही आणि आमच्यावर टीका करतात.उद्धव ठाकरे यांना बोलायला अडवलं कुणी ? मुख्यमंत्र्यांनी सांगितले, त्यावर उत्तर द्या. वैयक्तिक आव्हाने देण्यापेक्षा मदत करा. आणि बाळासाहेबांची 80 टक्के समाजसेवा तुम्ही बासनात गुंडाळली,अशी टीका दरेकर यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच कर्जमाफीची आणि मदतीची प्रक्रिया सुरू आहे. अतिरिक्त मदतीसाठी काल मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटुन आहे आहेत.त्यामुळे प्रक्रिया वेगाने सूरू असून दिलासा देण्यासाठी सरकार सक्षम आहे,असे देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.