नवरात्रीचा सातवा दिवस : संकटे होतील दूर, अशी करा कालरात्री देवीची पूजा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
शारदीय नवरात्र उत्सव आता समाप्तीकडे आला आहे. रविवारी नवरात्राची सातवी माळ असून या दिवशी कालरात्रि देवीची पूजा केली जाते.
मुंबई: शारदीय नवरात्र उत्सव आता समाप्तीकडे आला आहे. रविवारी 28 सप्टेंबर 2025 रोजी नवरात्राची सातवी माळ असून या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. सातव्या दिवशी देवीची पूजा कशी करावी? कोणती माळ अर्पण करावी आणि कोणता नैवेद्य दाखवावा? याबद्दल आदित्य जोशी गुरुजी यांनी माहिती दिली आहे.
देवीचे स्वरुप
कालरात्री देवीचे रूप पाहायला भयप्रद असले तरी त्या भक्तांच्या रक्षणासाठी नेहमी सज्ज असतात. देवी चतुर्भुज आहेत. एका हातात तलवार, दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र, तर उरलेल्या दोन हातांत अभयमुद्रा आणि वरमुद्रा आहेत. देवीचे वाहन गाढव असून तिचे नेत्र खूप मोठे आणि विजेसारखे चमकणारे आहेत. देवीला कालीमातेचे स्वरुपही मानले जाते. विशेष म्हणजे, अकाल मृत्यूचे भय टाळण्यासाठी कालरात्रि देवीची पूजा केली जाते, असे धर्मग्रंथात सांगितले आहे.
advertisement
देवीला कोणती माळ अर्पण करावी?
या दिवशी कालरात्री देवीला लाल जास्वंदाच्या फुलांची माळ अर्पण करणे सर्वात शुभ मानले जाते. लाल रंग हा शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे, त्यामुळे या दिवशी लाल फुलांनी सजवून देवीचे पूजन करावे.
advertisement
देवीला कोणता नैवेद्य दाखवावा?
कालरात्री देवीच्या पूजनात गुळाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. याशिवाय सातव्या दिवशी देवीला खीर (पायस) आवर्जून अर्पण करावा, असे धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे.
पूजनाचे महत्त्व
कालरात्री देवीच्या पूजनाने संकटे दूर होतात, शत्रूंचा नाश होतो आणि भक्तांना धैर्य, समृद्धी तसेच रिद्धी-सिद्धी प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 8:49 PM IST