Pune: कला प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांना दिली प्रेरणा, पुण्याच्या भारती भगत ठरल्या आदर्श शिक्षिका
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Pune: भारती भगत यांनी आत्तापर्यंत विद्यार्थ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
पुणे: पुण्यातील 'लोयला हायस्कूल'मधील कला शिक्षिका भारती भगत यांना यावर्षी राज्य शासनाचा 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार' मिळाला आहे. कला शिक्षिका म्हणून भारती भगत यांनी आत्तापर्यंत विद्यार्थ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. लोकल 18शी बोलताना त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली
मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील भारती भागत, पाषाण येथील लोयला हायस्कूल येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भारती भगत या विद्यार्थ्यांना चित्रकला, हस्तकला आणि विविध कलात्मक उपक्रमांमधून शिक्षण देत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, आत्मविश्वास आणि कलेची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी नेहमीच विशेष प्रयत्न केले. शालेय स्तरावरील विविध चित्रकला स्पर्धा, नाट्यरंग प्रयोग, पोस्टर निर्मिती उपक्रम तसेच पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या कला प्रकल्पांमधून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे.
advertisement
राज्य शासनामार्फत देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार हा शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा उच्च सन्मान मानला जातो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण पद्धती रुजवणाऱ्या शिक्षकांचा या पुरस्काराने गौरव केला जातो
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना भारती भगत म्हणाल्या, "हा पुरस्कार माझा वैयक्तिक यशाचा गौरव नसून सर्व विद्यार्थ्यांचा आणि शाळेचा गौरव आहे. कला ही फक्त विषयापुरती मर्यादित नसून ती मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देते, हे मी नेहमी अनुभवलं आहे. पुढील काळातही विद्यार्थ्यांसाठी अशाच नवनवीन कलात्मक संधी निर्माण करण्याचा माझा प्रयत्न राहील."
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 27, 2025 4:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune: कला प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांना दिली प्रेरणा, पुण्याच्या भारती भगत ठरल्या आदर्श शिक्षिका