IND vs PAK फायनल लढतीत अभिषेक बच्चनची उडी, बॉलिवूड स्टाईलमध्ये पाकिस्तानच्या शोएब अख्तरची झिंग उतरवली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारत पाकिस्तान वादात आता बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने उडी घेतली आहे. विशेष म्हणजे अभिषेक बच्चनने उडी घेतली नाही तर पाकिस्तानची इज्जत काढली आहे.
India vs Pakistan Asia Cup Final : भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघामध्ये फायनलचा सामना पार पडणार आहे.या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे. अशात भारत पाकिस्तान वादात आता बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने उडी घेतली आहे. विशेष म्हणजे अभिषेक बच्चनने उडी घेतली नाही तर पाकिस्तानची इज्जत काढली आहे.पण अभिषेक बच्चनने या वादात उडी का घेतली?हे जाणून घेऊयात.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 चा फायनल सामना 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.या सामन्यापुर्वी माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानी कर्णधार सलमान आघाच्या संघाला सल्ला दिला. शोएब अख्तरने अभिषेक बच्चनला लवकर आऊट करण्याचा सल्ला दिला आहे.खरं तर त्याला अभिषेक शर्मा बोलायंच होतं पण तो अभिषेक बच्चन बोलून बसला आहे.त्यामुळे त्याची मोठी फजिती झाली आहे.
advertisement
advertisement
अभिषेक बच्चनला लवकर बाद करा
खरं तर भारत-पाकिस्तान फायनलपूर्वी, गेम ऑन है या क्रिकेट टॉक शोच्या एका भागात शोएब अख्तरने आशिया कप फायनलबद्दल चर्चा करताना चुकून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचा उल्लेख केला. त्याने म्हटले की सुरुवातीच्या विकेट पडल्यानंतर भारताच्या मधल्या फळीला संघर्ष करावा लागेल.
शोएब अख्तरने प्रश्न विचारला की जर पाकिस्तानने अभिषेक बच्चनला लवकर बाद केले तर भारताच्या मधल्या फळीचे काय होईल. त्यांच्या मधल्या फळीने चांगली कामगिरी केली नाही. शोएबच्या चुकीच्या उच्चारानंतर, अँकर आणि इतर पाहुण्यांनी त्याला आठवण करून दिली की त्याने अभिषेक शर्माचा चुकीचा उच्चार केला होता. शोएब अख्तरचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
advertisement
अभिषेक बच्चनची प्रतिक्रिया
शोएब अख्तरची ऑन एअर चूक व्हायरल झाल्यानंतर बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन देखील विनोदी टिप्पणीसह सामील झाला. क्रिकेट, फुटबॉल आणि कबड्डी सारख्या खेळांचे चाहते असलेले बच्चन यांनी ही क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आणि त्यांच्या खास शैलीत कमेंट केली. अभिषेकने एक्सला लिहिले, "सर, मी तुमचा खूप आदर करतो... आणि मला वाटत नाही की पाकिस्तान हे करू शकेल आणि मला क्रिकेट फारसे माहित नाही,अशा शब्दात बच्चनने शोएबची फिरकी घेतली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 8:30 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK फायनल लढतीत अभिषेक बच्चनची उडी, बॉलिवूड स्टाईलमध्ये पाकिस्तानच्या शोएब अख्तरची झिंग उतरवली