मोठी बातमी, HDFC बँकेला धक्का; ग्राहकांशी व्यवहार बंदी, नवे खाते उघडण्यास मज्जाव, आंतरराष्ट्रीय व्यवसायावर परिणाम

Last Updated:

HDFC Bank: दुबई फायनान्शियल सर्व्हिसेस अथॉरिटीने (DFSA) एचडीएफसी बँकेच्या दुबई शाखेला मोठा धक्का देत नवीन ग्राहकांशी व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. ऑनबोर्डिंग प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

News18
News18
मुंबई: एचडीएफसी बँकेच्या दुबई शाखेला (Dubai International Financial Centre–DIFC) तेथील नियामक प्राधिकरण Dubai Financial Services Authority (DFSA) कडून मोठा धक्का बसला आहे. DFSA ने बँकेवर नवीन ग्राहकांशी व्यवहार करण्यास तसेच त्यांच्या नावाने वित्तीय प्रमोशन करण्यास बंदी घातली आहे. ही कारवाई बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याच्या आणि ग्राहकांची योग्य ऑनबोर्डिंग प्रक्रिया पूर्णकेल्याच्या आरोपांनंतर करण्यात आली आहे.
advertisement
नवीन ग्राहकांवर मर्यादा 
एचडीएफसी बँकेने एक्स्चेंज फाइलिंगद्वारे स्पष्ट केले आहे की- ही बंदी फक्त नवीन ग्राहकांसाठी लागू असेल. आधीपासून दुबई शाखेशी जोडलेले ग्राहक नेहमीप्रमाणे सेवा घेऊ शकतील. तसेच ज्यांना पूर्वी वित्तीय सेवा ऑफर करण्यात आल्या होत्या पण त्यांनी तेव्हा खाते उघडले नव्हते, त्यांनाही सेवा सुरू ठेवण्याची परवानगी आहे. DFSAचा हा आदेश लिखितरित्या बदल किंवा रद्द होईपर्यंत लागू राहणार आहे.
advertisement
 कारवाईमागचे कारण
DFSAच्या तपासात असे उघड झाले की एचडीएफसी बँकेने काही ग्राहकांना पूर्ण ऑनबोर्डिंग प्रक्रिया न करता वित्तीय सेवा उपलब्ध करून दिल्या. ऑनबोर्डिंग प्रक्रियेत ग्राहकांच्या कागदपत्रांची योग्य पडताळणी आणि नियामक मानकांचे पालन करणे अत्यावश्यक असते. या प्रक्रियेत झालेली चूक ही नियमभंग मानली गेली. याच कारणामुळे DFSAने बँकेवर नवीन ग्राहकांवरील बंदीचा निर्णय घेतला.
advertisement
बँकेची प्रतिक्रिया...
एचडीएफसी बँकेने निवेदन जारी करून सांगितले आहे की- DFSAच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. बँक तपासात पूर्ण सहकार्य करेल आणि कमतरता लवकरात लवकर दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे आश्वासनही बँकेने दिले आहे. सध्या विद्यमान ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र नवीन ग्राहकांवरील तात्पुरत्या बंदीमुळे बँकेच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायावर काही प्रमाणात दबाव येऊ शकतो, असे मानले जात आहे.
advertisement
मराठी बातम्या/मनी/
मोठी बातमी, HDFC बँकेला धक्का; ग्राहकांशी व्यवहार बंदी, नवे खाते उघडण्यास मज्जाव, आंतरराष्ट्रीय व्यवसायावर परिणाम
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement