advertisement

Pune best Foods: 147 वर्षांची परंपरा, पुण्यात प्रसिद्ध आहे पारशी जेवणासाठी रेस्टॉरंट, खवय्यांची मोठी गर्दी

Last Updated:
1878 साली हे रेस्टॉरंट स्थापन झालं, तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जवळपास 147 वर्षांपासून हा व्यवसाय अखंडपणे सुरू आहे.
1/7
पुणे शहरात अनेक जुन्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यातीलच एक पुण्यातील कॅम्प परिसरात वसलेलं दोराबजी अँड सन्स हे शहरातील सर्वात जुनं रेस्टॉरंट आहे.

2/7
1878 साली हे रेस्टॉरंट स्थापन झालं, तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जवळपास 147 वर्षांपासून हा व्यवसाय अखंडपणे सुरू आहे. हे एक पारशी पारंपरिक रेस्टॉरंट आहे, जे आजही आपल्या मूळ चव आणि शैलीसह टिकून आहे. या रेस्टॉरंट बद्दलचं मालक दारीयस दोराबजी यांनी माहिती दिली आहे.

3/7
मालक दारीयस दोराबजी सांगतात की, या रेस्टॉरंटची सुरुवात माझ्या पणजोबांनी 1878 साली केली होती. त्या काळात भारतात रेस्टॉरंट्स ही संकल्पना फारशी प्रचलित नव्हती.

4/7
ब्रिटिश आणि इंग्लिश ऑफिसर्स पुण्यात येत असत आणि त्यांच्यासाठी चहा आणि बनमस्का सर्व्ह करणे यापासून या रेस्टॉरंटची सुरुवात झाली. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद पाहून, सहा महिन्यांनी पूर्ण जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. त्या वेळी फूडसाठी विशेष मागणी होती आणि त्यामुळे पारशी जेवणांची सुरुवात झाली.

5/7
आजही येथे पारंपरिक पारशी पदार्थ जसे की धनसाक, पुलाव, चिकन, बिर्याणी आणि माशांचे पदार्थ मिळतात. विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ कोळशावर बनवले जातात.

6/7
त्यामुळे त्यांच्या चवीलाही एक खास पारंपरिक झणझणीतपणा असतो. या रेस्टॉरंटमध्ये आजही पारंपरिक पद्धती जपल्या जातात, असं दारीयस दोराबजी सांगतात.

7/7
दोराबजी अँड सन्स हे केवळ एक रेस्टॉरंट नसून, पुण्याच्या सांस्कृतिक आणि खाद्य परंपरेचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. 19 व्या शतकापासून ते आजपर्यंत सातत्याने खाद्यप्रेमींचं मन जिंकत आलं आहे. पारशी संस्कृतीची चव आणि इतिहास यांचं सुंदर मिश्रण असलेलं हे ठिकाण अनेक जणं आवडीनं भेट देतात, असंही दारीयस दोराबजी यांनी सांगितले.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement