सदर प्रकरण अधिक संशयास्पद असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण देशमुख यांच्या मृतदेहावर काही जखमा, व्रण आढळून आले आहेत. या जखमांमुळे आत्महत्येचा दावा अधिक संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळे दबक्या आवाजात हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. प्राथमिक तपासात कोणतीही चिठ्ठी किंवा आत्महत्येचं स्पष्ट कारण समोर आलेलं नाही.
advertisement
पंकज देशमुख हे स्थानिक राजकारणात सक्रीय असून ते अनेक वर्षांपासून भाजपशी संबंधित होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.