TRENDING:

सरनाईकांना आस्मान दाखवलं, मिरा भाईंदर महापालिका एकहाती जिंकली, भाजपच्या नरेंद्र मेहतांनी डिवचलं

Last Updated:

मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा दारूण पराभव झाला. भारतीय जनता पक्षाने तब्बल ७८ जागा जिंकल्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मिरा–भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत ८७ पैकी तब्बल ७८ जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज भाजपातर्फे पहिली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी मिरा–भाईंदरमधील जनतेचे, मतदारांचे तसेच पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. जनतेने भाजपावर विश्वास ठेवून विकासाच्या भूमिकेला पाठिंबा दिला, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
नरेंद्र मेहता-प्रताप सरनाईक
नरेंद्र मेहता-प्रताप सरनाईक
advertisement

शिवसेना नेते, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मिरा–भाईंदरमध्ये चांगलेच राजकीय वजन होते. परंतु भाजपने निवडणूक काळात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत शिवसेनेला धोबीपछाड दिला. निवडणुकीतही भाजपने अतिशय आक्रमक प्रचार करीत शिंदेसेनेवर प्रहार केले.

नरेंद्र मेहता यांची प्रताप सरनाईक यांच्यावर टोलेबाजी

निवडणूक जिंकल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यांवरही प्रतिक्रिया दिली. भाजपाच्या कारभारात भ्रष्टाचाराला अजिबात स्थान नसून पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासन हेच पक्षाचे धोरण असल्याचा पलटवार त्यांनी केला.

advertisement

याचवेळी आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्र्यांना मिरा–भाईंदर शहरासाठी दिलेल्या तीन महत्त्वाच्या आश्वासनांची आठवण करून दिली. पॉड टॅक्सी प्रकल्प, ३०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय आणि पोलीस ठाणे हद्दीतील रस्त्यांची दुरुस्ती आणि सुधारणा ही कामे पूर्ण केल्यास मिरा–भाईंदरची जनता त्यांची सदैव ऋणी राहील, असे आमदार मेहता यांनी सांगितले. भाजपाच्या या ऐतिहासिक विजयानंतर मिरा–भाईंदर शहराचा विकास अधिक वेगाने होईल आणि नागरिकांना उत्तम सुविधा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

advertisement

मिरा–भाईंदर महानगरपालिका निवडणूक निकालात कोणत्या पक्षाला किती जागा?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात महागलेला शेवगा आता जागेवर आला, डाळिंबाचीही आवक वाढली, दर किती?
सर्व पहा

मिरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. २४ प्रभागांत ८५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ८७ जागांवर विजय मिळवला. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जवळपास १७ जागा वाढल्या आहेत. शिवसेनेला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सरनाईकांना आस्मान दाखवलं, मिरा भाईंदर महापालिका एकहाती जिंकली, भाजपच्या नरेंद्र मेहतांनी डिवचलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल