बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युवकांचा सक्रीय सहभाग वाढवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत. विशेषतः प्रथमच मतदान करणाऱ्या युवा वर्गाशी अधिक प्रभावीपणे संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया अभियान, ऑनग्राउंड जनसंपर्क, युवा संवाद, वर्कशॉप्स आणि डिजिटल कार्यक्रम यासारख्या विविध माध्यमांचा वापर करून युवकांमध्ये भाजपच्या विचारांची मांडणी करण्यात येणार आहे.
advertisement
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात युवकांशी थेट संपर्क साधण्यासाठी युवा मोर्चा स्वतंत्र कार्य योजना तयार करणार आहे. या बैठकीमध्ये राज्यभरातील युवा पदाधिकारी, तालुका व मंडळस्तरीय कार्यकर्ते, तसेच सोशल मीडिया टीमला सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भाजप प्रदेश नेतृत्वाचे स्पष्ट मत आहे की, भविष्यातील सक्षम नेतृत्व आजच्या तरुणांमधूनच घडणार आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी युवा मोर्चा महत्त्वाची भूमिका बजावेल. या बैठकीच्या माध्यमातून पक्षाच्या आगामी रणनितीवर सुस्पष्ट दिशा आखली जाणार असून, युवांमध्ये नवचैतन्य निर्माण करून पक्षाला बळकट करण्याचे उद्दिष्ट आहे.
भाजप युवा मोर्चाची ही बैठक म्हणजे फक्त नियोजन नव्हे, तर युवाशक्तीला केंद्रस्थानी ठेवून भविष्यातील राजकीय यशाची मजबूत पायाभरणी ठरणार आहे.कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. प्रतारयंत्रना ते मतदारांना आकर्षित करण्यासाठी युवकांचा महत्त्वाचा रोल असणार आहे यामुळे आता थोड्या वेळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सर्व युवकांच्या समस्या जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर मार्गदर्शन करणार आहेत.
