भाजप हा मोठा पक्ष आहे आणि मोठा भाऊ म्हणून आम्ही प्रत्येकाला घेऊन चालण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे युवा स्वाभिमानला आम्ही हात देऊन युती करण्याचा प्रयत्न केला. तरीही भारतीय जनता पक्षाने राणांच्या छोट्याशा पक्षाला नऊ जागा दिल्या होत्या, मात्र रवी राणांची भूक मोठी होती ती भूक आम्ही शमवू न शकल्याने आम्ही ही युती तोडली आहे, असे प्रवीण पोटे म्हणाले.
advertisement
आमच्यासोबत राहायचं आणि घरातल्यांसाठी मतं मागायची, नवनीत राणांवर प्रहार
खरे तर आम्हाला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही. आम्ही मित्रपक्ष म्हणून सोबत घेतले, परंतु त्यांची भूक मोठी आहे, त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे, असे पोटे म्हणाले. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही कमळासाठी मतदान मागतो. दुसऱ्या कोणासाठीही आम्ही मतदान मागत नाही. पण काही आमचे नेते आमच्या सोबत राहतात आणि आमच्याच खिशात हात घालतात. आमच्या सोबत राहायचं आणि आमच्या विरोधात बोलून त्यांच्या घरातल्या लोकांसाठी मतदान मागत असल्याचा गंभीर आरोप नाव न घेता नवनीत राणा यांच्यावर केला आहे.
