विनोद तावडे, रामदास आठवले, माया चिंतामण ईवनाते, रामराव वडकुते यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. भाजपकडून संधी देताना राजकीय अनुभव, पक्षनिष्ठा आणि प्रादेशिक प्रातिनिधित्वाचा विचार केलेला दिसतो. महाराष्ट्रातून राज्यसभेवर कुणाला संधी द्यावी, याबाबत भाजपच्या केंद्रीय समितीमध्ये दीर्घ चर्चा झाली. चर्चेअंती ४ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
कोण आहेत मायाताई ईवनाते?
मायाताई इवनाते या भाजपच्या अत्यंत अभ्यासू आणि सक्रिय नेत्या मानल्या जातात. त्यांनी नागपूरचे महापौरपद भूषवले असून स्थानिक राजकारणात त्यांचा दांडगा अनुभव आहे. त्या 'राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या' (NCST) माजी सदस्या राहिल्या आहेत. या पदावर असताना त्यांना दिल्लीत राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला होता. महिला नेतृत्व, आदिवासी चेहरा आणि विदर्भातील प्रतिनिधित्व अशा तिन्ही आघाड्यांचा विचार करून भाजपने त्यांना उमेदवारी दिली असल्याची चर्चा आहे. आदिवासी समुदायामध्ये मायाताई यांचा मोठा प्रभाव असून, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगावर काम केल्यामुळे त्यांना दिल्लीतील कामकाजाचाही चांगला अनुभव आहे.
advertisement
कोण आहेत रामराव वडकुते?
रामराव वडकुते हे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. २०१९ मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. रामराव वडकुते यांनी हिंगोली विधानसभेतून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज होते.
दरम्यान, वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषवलं आहे. परभणी जिल्ह्यात धनगर प्रश्नांसाठी ते सुरुवातीपासून सक्रिय आहेत. त्यानंतर ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात कार्यरत राहिले
