सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आज मुंबई महापालिकेसाठी निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, आणि महिला अशा विविध घटकांच्या प्रतिनिधीत्वासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.
या आरक्षणाचा फटका सगळ्याच पक्षातील दिग्गजांना बसला. शिवसेना ठाकरे गटासह भाजप, शिंदे गटाच्या नगरसेवकांनाही दुसऱ्या वॉर्डमधून निवडणूक लढवावी लागू शकते. अन्यथा या टर्ममध्ये विश्रांती घ्यावी लागू शकते, अशी चिन्हे आहेत.
advertisement
> ठाकरे गटाला बालेकिल्ल्यातच धक्का...
आजच्या आरक्षण सोडतीचा फटका ठाकरे गटाला बालेकिल्ल्यातील शिलेदारांना बसला आहे. दादर-माहीम हा भाग ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, या ठिकाणाहून दोन माजी महापौरांना आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे. मिलिंद वैद्य आणि विशाखा राऊत यांचा वॉर्ड ओबीसींसाठी राखीव झाला आहे. यापूर्वी हा वॉर्ड खुल्या गटासाठी होता. दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र, आरक्षण सोडतीमुळे त्यांना अन्य पर्यायाची चाचपणी करावी लागणार आहे. त्याशिवाय, उत्तर मुंबईत दहिसर भागात तेजस्वी घोसाळकर यांचा वॉर्डही ओबीसींसाठी राखीव झाला आहे. त्यांनाही दुसऱ्या वॉर्डमधून निवडणूक लढवावी लागण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपमध्ये प्रवेश केलेले रवी राजा, भाजपचे माजी नगरसेवक नील किरीट सोमय्या यांचे वॉर्डदेखील आरक्षित झाले आहेत.
>> कोणत्या महत्त्वाच्या माजी नगरसेवकांना बसला धक्का?
- माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांना धक्का वार्ड क्रमांक एक ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित
- किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांचा वार्ड १०८ ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित
- वरळीत ठाकरे गटाचे आशिष चेंबुरकर यांना धक्का
- आशिष चेंबूरकर यांचा वार्ड क्रमांक १९६ महिला ओपनसाठी आरक्षित
- ठाकरे गटाचे घाटकोपरचे विभागप्रमुख सुरेश पाटील यांना आरक्षणाचा फटका
- सुरेश पाटील यांचा वार्ड क्रमांक १२७ महिला ओपनसाठी आरक्षित
- ठाकरे गटाच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर यांना धक्का, स्नेहल आंबेकर यांचा वार्ड क्रमांक १९८ ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित
- माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि शिंदे गटाचे नेते यशवंत जाधव यांना धक्का, यशवंत जाधव यांचा वार्ड क्रमांक २०९ महिला ओपनसाठी आरक्षित
यशवंत जाधव हे सलग चार वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत
- भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचा वार्ड क्रमांक २२७ महिला वर्गासाठी आरक्षित
- काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा वार्ड क्रमांक १७६ ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित
>> कोणाचे वॉर्ड आरक्षित?
> १३३ - महिला वॉर्ड - माजी नगरसेवक परमेश्वर कदम शिंदे गट
> १८३ - महिला वॉर्ड - माजी नगरसेवक गंगा माने
> १४७ - महिला वॉर्ड - माजी नगरसेवक अंजली नाईक (ओबीसी)
> १८६ - महिला वॉर्ड - माजी नगरसेवक वसंत नकाशे (ठाकरे गट) ओबीसी
> १५५ - महिला वॉर्ड - माजी नगरसेवक श्रीकांत शेट्ये - ठाकरे गट (SC राखीव)
> ११८ - महिला वॉर्ड - माजी नगरसेवक उपेंद्र सावंत
> १५१ - महिला वॉर्ड माजी नगरसेवक राजेश फुलवारिया
> १८९ - महिला वॉर्ड - माजी नगरसेवक हर्षदा मोरे
> २०८ - ओबीसी - माजी नगरसेवक रमाकांत रहाटे
> ७२ - ओबीसी - माजी नगरसेवक पंकज यादव (२०१७ - ओबीसी)
> १७० - ओबीसी - माजी नगरसेवक कप्तान मलिक ( एनसीपी- AP)
> १७६ - ओबीसी - माजी विरोधी पक्ष नेता - रवी राजा
> १९१ - ओबीसी - माजी नगरसेवक विशाखा राऊत
> १०८ - ओबीसी - माजी नगरसेवक नील सोमय्या
> ११७ - ओबीसी - माजी नगरसेवक सुवर्णा कारंजे
> १७१ - ओबीसी - माजी नगरसेवक सानवी तांडेल
> १- ओबीसी - माजी नगरसेवक तेजस्विनी घोसाळकर
> २२६ - ओबीसी - माजी नगरसेवक हर्षदा नार्वेकर
> १८२ - ओबीसी - माजी नगरसेवक मिलिंद वैद्य ठाकरे गट
> २०८ - ओबीसी - माजी नगरसेवक रमाकांत रहाटे
> ८७ - ओबीसी - माजी नगरसेवक - विश्वनाथ महाडेश्वर (निधन)
> १५३ - ओबीसी - माजी नगरसेवक अनिल पठाणकर
> १९३ - ओबीसी - माजी नगरसेवक हेमांगी वरळीकर
