TRENDING:

BMC Shiv Sena UBT: अर्धी मुंबई अजूनही ठाकरेंच्याच हाती! पालिकेत सत्ता येऊनही महायुतीचं टेन्शन का वाढलं?

Last Updated:

BMC Shiv Sena UBT: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने सर्वाधिक जागा जिंकून सत्तेचा गड सर केला असला, तरी पालिकेचा कारभार चालवताना त्यांना 'पावलोपावली' संघर्षाचा सामना करावा लागणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने सर्वाधिक जागा जिंकून सत्तेचा गड सर केला असला, तरी पालिकेचा कारभार चालवताना त्यांना 'पावलोपावली' संघर्षाचा सामना करावा लागणार आहे. महापालिकेत महापौर महायुतीचा बसणार असला तरी, प्रशासकीय नाड्या मात्र उद्धव ठाकरे यांच्या हाती राहण्याची चिन्हे आहेत. मुंबई महापालिकेच्या १८ पैकी ८ प्रभाग समित्यांवर ठाकरे गटाचे वर्चस्व निर्माण झाल्याने अर्ध्या मुंबईच्या विकासकामांचे भवितव्य आता 'मातोश्री'वरून ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अर्धी मुंबई अजूनही ठाकरेंच्याच हाती! पालिकेत सत्ता येऊनही महायुतीचं टेन्शन का वाढलं?
अर्धी मुंबई अजूनही ठाकरेंच्याच हाती! पालिकेत सत्ता येऊनही महायुतीचं टेन्शन का वाढलं?
advertisement

बहुमतात महायुती, तरीही ८ समित्यांवर ठाकरेंचा 'वचक'

मुंबई महानगरपालिकेत एकूण १८ प्रभाग समित्या आहेत. महायुतीने बहुमताचा आकडा पार केला असला तरी, वॉर्डनिहाय समीकरणे पाहता ८ प्रभाग समित्यांवर ठाकरे गटाचे नगरसेवक बहुमतात आहेत. याचा अर्थ असा की, रस्ते, पाणी, कचरा आणि आरोग्य यांसारख्या स्थानिक प्रश्नांवर निर्णय घेण्याचे अधिकार या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षांकडे असतील, जिथे ठाकरेंची सत्ता असेल. मुंबई महापालिकेच्या विकासकामात प्रभाग समिती महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईतील ८ प्रभाग समितीवर ठाकरेंचा प्रभाव असणार आहे. तर, ८ नगरसेवक असणाऱ्या एमआयएमकडे एक प्रभाग समिती असणार आहे. तर, प्रभागात समसमान संख्याबळ असल्याने चिठ्ठीद्वारे प्रभाग समिती अध्यक्ष निवडला जाणार आहे.

advertisement

महापौर विरुद्ध प्रभाग अध्यक्ष, संघर्षाची ठिणगी

भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीचा महापौर जरी पालिकेच्या मुख्यालयात बसला, तरी स्थानिक पातळीवरील विकासकामांच्या फाईल्स मंजूर करताना त्यांना ठाकरेंच्या प्रभाग अध्यक्षांशी संघर्ष करावा लागणार आहे. विशेषतः मुंबई शहर आणि उपनगरातील महत्त्वाच्या विभागांमध्ये ठाकरे गटाचे वर्चस्व असल्याने महायुतीला प्रत्येक कामासाठी 'तडजोड' करावी लागण्याची शक्यता आहे.

advertisement

'मातोश्री'चा प्रभाव कायम

पालिकेत सत्ता नसतानाही अर्ध्या मुंबईवर वर्चस्व राखण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होताना दिसत आहेत. यामुळे आगामी काळात महापौरांच्या घोषणा आणि प्रभाग समितीची अंमलबजावणी यामध्ये मोठा राजकीय पेच पाहायला मिळू शकतो.

>> कोणत्या प्रभाग समितीवर येणार कोणाची सत्ता

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: हळदीनं मार्केट खाल्लं, डाळिंब अन् आल्याला किती मिळाला भाव?
सर्व पहा

प्रभाग समिती (विभाग) वर्चस्व / सत्ता मुख्य पक्ष / गट
A, B, E महाविकास आघाडी ठाकरे गट (शिवसेना)
C, D महायुती भाजप - शिंदे गट
F-दक्षिण, F-उत्तर महाविकास आघाडी ठाकरे गट
G-दक्षिण महाविकास आघाडी ठाकरे गट
G-उत्तर महाविकास आघाडी ठाकरे गट
H-पूर्व, H-पश्चिम महाविकास आघाडी ठाकरे गट / काँग्रेस
K-दक्षिण महायुती भाजप - शिंदे गट
K-उत्तर महाविकास आघाडी ठाकरे गट
K-पश्चिम महायुती भाजप
P-दक्षिण महायुती भाजप
P-पूर्व, P-पश्चिम महाविकास आघाडी ठाकरे गट
R-दक्षिण महायुती भाजप
R-मध्य, R-उत्तर महायुती भाजप
M-पूर्व (गोवंडी) MIM एमआयएम (८ नगरसेवक)
M-पश्चिम महायुती भाजप - शिंदे गट
L (कुर्ला) महाविकास आघाडी ठाकरे गट
N (घाटकोपर) महायुती भाजप
S (भांडुप) व T (मुलुंड) पेच (समसमान) चिठ्ठीवर निकाल ठरणार

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Shiv Sena UBT: अर्धी मुंबई अजूनही ठाकरेंच्याच हाती! पालिकेत सत्ता येऊनही महायुतीचं टेन्शन का वाढलं?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल