TRENDING:

Buldhana News: 40 हजारासाठी 6 तास अडवला मृतदेह, पुण्यानंतर आता बुलढाण्याच्या रुग्णालयाच प्रताप

Last Updated:

जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत मृतदेह देणार नाही असे म्हणत बुलढाण्यातील रुग्णालायाने महिलेचा मृतदेह तब्बल 6 तास अडवून ठेवला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल खंडारे, प्रतिनिधी
Buldhana News
Buldhana News
advertisement

बुलढाणा : 10 लाखांसाठी गर्भवती महिलेवर उपचार नाकारल्याने मृत्यू झाल्याची पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटना ताजी असताना बुलढाण्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 40 हजार रुपयांसाठी सहा तास मृतदेह अडकवून ठेवल्याचा प्रकार मलकापूर येथील हकिमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे घजला आहे. या घटनेनंतर नातेवाईक प्रचंड संतापले आहेत.

मलकापूर शहरातील कला रोडवरील हकिमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतून ऑपरेशन होऊन मरण पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना 40 हजार रुपयांची मागणी करत मृतदेह तब्बल 6 तास अडवून ठेवला होता. कमला बाई इंगळे असे मृत व्यक्तीते नाव असून त्यांच्या पायाला इजा झाली होती, त्यामुळे त्यांच्यावर ऑपरेशन करण्यात आले होते, दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

advertisement

40 हजारासाठी मृतदेह  6 तास अडवला

कमलाबाईंचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यावेळी 40 हजार रुपयांचे बिल बाकी असल्याचं सांगत उर्वरीत रक्कमेची मागणी करण्यात आली. जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत मृतदेह देणार नाही असे म्हणत रुग्णालायाने महिलेचा मृतदेह तब्बल 6 तास अडवून ठेवला. हा प्रकार समोर आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रमध्ये रुग्णालयाकडून होत असलेल्या घटनाबाबत काहीतरी ठोस पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे.

advertisement

काय आहे पुण्याचे प्रकरण?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अनामत रक्कम म्हणून १० लाखांची मागणी करून गर्भवती महिलेस उपचारास नकार दिल्याचा आरोप तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी केला. अडीच लाख भरतो, असे सांगूनही रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे आम्हाला आमच्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले. दरम्यानच्या काळात उपचाराला विलंब झाल्याने तनिषाचा मृत्यू झाला. याला सर्वस्वी जबाबदार मंगेशकर रुग्णालय आहे, असा गंभीर आरोप भिसे कुटुंबियांनी केला. या घटनेनंतर दीनानाथच्या व्यवस्थापनावर टीकेची झोड उठली आहे. पैशांसाठी उपचार करायला नकार दिल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे पुणे शहरासह महाराष्ट्रात पडसाद उमटले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Buldhana News: 40 हजारासाठी 6 तास अडवला मृतदेह, पुण्यानंतर आता बुलढाण्याच्या रुग्णालयाच प्रताप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल