नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दोन युवती दुचाकीवरून सुसाट वेगात जात होत्या. दरम्यान, एका चौकात डाव्या बाजुने येणारी बोलेरो गाडी न पाहाताच तरुणींनी वेगाने रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. पण बोलेरो गाडीचा देखील वेग अधिक असल्याने बोलेरोनं दुचाकीला धडक मारली. यावेळी दुचाकीवरील दोन्ही युवती रस्त्यावर खाली पडल्या. दरम्यान, दुचाकी चालवणारी युवती थेट बोलेरोच्या चाकाखाली आली. बोलेरो थेट खाली पडलेल्या युवतींच्या अंगावरून पुढे गेली.
advertisement
अपघात घडताच परिसरात मोठा आवाज झाला आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी युवतींना वाचवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही युवती या अपघातात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या कृष्णा हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
सीसीटीव्हीत कैद झाला थरार
हा संपूर्ण अपघात परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्या वेगाने ही बोलेरो गाडी युवतींच्या अंगावरून गेली, ते पाहून उपस्थित नागरिकही हादरून गेले होते. या घटनेची माहिती मिळताच कराड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत असून अधिक तपास सुरू आहे.
