बोरीवली गावातील छाप्यात एटीएसएन काही संशयितांना ताब्यात घेतलं. हे शाकीन नाचननं तयार केलेले स्लीपर सेल असून त्यांनी तुर्कीचा दौरा केल्याचं बोललं जातं. यासंदर्भात एटीएसकडून त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जातेय. तुर्कीमध्ये जाऊन त्यांनी ISIS या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. हे स्लीपर सेल पहलगाम हल्ल्यानंतर घातपात करण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरूनच एटीएसनं छापेमारी केली. छाप्यात काही संवेदनशील कागदपत्र सापडली असून, या ताब्यात असलेल्या संशयितांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
advertisement
15 तरुणांना दिली जबाबदारी
नाचण परिवाराने स्लिपर सेल तयार केला होत. भारताविरोधात देशविघातक कृत्य करण्याकरता स्लिपर सेल तयार केला होता. मुस्लिम तरुणांची माथी भडकवण्याचं काम स्लिपर सेल करत होता. हा स्लिपर सेल म्हणजे एक प्रकारे शरीयत ए अल शाम कायद्यानुसार मंत्रीमंडळ तयार केल्याचा तपास यंत्रणांना संशय होता. याकरता 15 तरुणांना जबाबदारी दिली होती. ज्यांना एखाद्या देशाच्या मंत्र्यांप्रमाणे अधिकार दिले होते अशी गोपनीय माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.
100 पेक्षा जास्त मुस्लिम तरुणांची भडकवली माथी
जवळपास 100 पेक्षा जास्त मुस्लिम तरुणांची शरीयत ए अल शाम च्या नावाखाली माथी भडकल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. या कारवाईत एकूण 19 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. फोन फॅारेन्सिक तपासा करता पाठवण्यात आले. एक स्वतंत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. ज्या द्वारे विविध देशातील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात ही 15 मुले होती असा संशय तपास यंत्रणांना आहे
