बुलढाणा : घरामध्ये आई-वडील नसताना 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने गळफास लावून जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यामध्ये घडला आहे. खामगावच्या तायडे कॉलनीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तायडे कॉलनीमध्ये राहणारे रहिवासी निलेश वरुडकर आणि त्यांच्या पत्नी कामानिमित्त घराबाहेर गेले होते, तेव्हा त्यांच्या मुलीने हे टोकाचं पाऊल उचललं.
14 वर्षांच्या सानिका वरुडकरने घरामध्ये आई-वडील नसताना छताच्या टिनपत्र्याच्या लोखंडी अँगलला साडी लावली आणि गळफास लावून घेतला. घरामध्ये कुणीच नसल्यामुळे ही घटना उशीरा लक्षात आली.
advertisement
14 वर्षांच्या सानिकाने आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला? याचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी सानिकाचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरूवात केली आहे. गळफास लावून घेण्याआधी सानिकाने घरामध्ये कोणती चिठ्ठी लिहून ठेवली होती का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
