TRENDING:

उज्जैनला दर्शनासाठी जात होते, कार डिव्हायडरवर आदळली, स्फोट होऊन एकाचा जळून कोळसा

Last Updated:

बुलडाण्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून जखमींवर खामगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बुलडाणा : भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडवर जाऊन आदळली. त्यात कारच्या पेट्रोलच्या टाकीचा स्फोट झाला. अपघातात एका व्यक्तीचा कारमध्येच जळून कोळसा झाला असून परिसरातील नागरिकांनी कारमधील चौघांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले.
बुलढाणा अपघात
बुलढाणा अपघात
advertisement

प्राथमिक माहितीनुसार लातूर येथून खामगावमार्गे उज्जैनला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या भरधाव कारचा खामगाव अकोला मार्गावरील हॉटेल सुदर्शनजवळ भीषण अपघात झाला. या धडकेत कारच्या पेट्रोल टाकीचा भडका झाल्याने कारने पेट घेतला.अपघातात कारमधील एकाचा जळून मृत्यू झाला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भाऊबीजची शॉपिंग करताय? 350 रुपयांत मिळतायत 3-पीस कॉटन ड्रेस, हे आहे लोकेशन
सर्व पहा

प्रसंगावधान ओळखून गावकरी लगोलग मदतीसाठी धावले. कारमधील महिलांसह चौघांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. परंतु कारमधील चालकाला स्फोटात जळून मृत्यू झाला.मृतकाचे नाव अरूण बाबूराव चिंचणसुरे रा. लातुर असे असून जखमींना तातडीने खामगाव शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उज्जैनला दर्शनासाठी जात होते, कार डिव्हायडरवर आदळली, स्फोट होऊन एकाचा जळून कोळसा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल