बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येरळी पुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. त्याचं झालं असं की येरळी पुलावर ही दोन्ही वाहने प्रवास करत होती. या दरम्यान भरधाव असलेल्या मालवाहू बोलेरो पिकअप गाडीने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराचा डोकं फुटून मेंदू बाहेर आला होता. हा मेंदू दुचाकीच्या सीटमध्ये जाऊन अडकून पडला होता.तर दुचाकीस्वाराचा मृतदेह रस्त्याबाहेर दूरुपर्यंत फेकला गेला होता.
advertisement
या अपघातानंतर बोलेरो पिकअप चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण खांडवी गावातील स्थानिक नागरीकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले होते.तसेच स्थानिकांनी चालकासह वाहन पकडल्याची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र वाहन पोलीस स्टेशनला लावण्याऐवजी पोलिसांनी या वाहनात असलेला शेतमाल पुढे जिनिंग वर उतरवला होता. त्यामुळे पोलिसांच्या या वागणुकीने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्याचसोबत जावेद खानचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेत पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.