केसं परत कशी आली?
ग्रामस्थ टक्कर व्हायरसने चिंताग्रस्त असताना आयुष्य होमिओपॅथी आणि युनानीच पथक टक्कर पडलेल्या रुग्णाच्या गावात तळ ठोकून होते. आयुष्य होमिओपॅथी आणि युनानीच्या पथकाने दिलेल्या औषधाने केस गळतीमुळे गेलेली केस आता परत येऊ लागल्याचं सांगत केस गळतीच्या रुग्णांमध्ये आता घट झाली असल्याची माहिती आरोग्य केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.
advertisement
तिसऱ्या दिवशी थेट टक्कल
बुलढाण्यातली शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांतील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण झाली होती. सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोके खाजवणं, नंतर सरळ केस हाती येणं आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीवरून डॉक्टरांचे पथक येऊनही यामागचे नेमके कारण समजू शकलं नव्हतं.
पोरांची लग्न जमेना
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात केसगळतीच्या आजाराने (Disease) अनेकांना त्रस्त केले आहे. या आजाराचे रुग्ण सापडलेल्या बोंडगावात (Bondgaon) आता कोणीही लग्नासाठी मुलगी द्यायला तयार नाही. ऐन लग्नसराईच्या दिवसांत लग्नाला आलेल्या मुलांना कोणीही मुली देत नसल्याने, तसेच मुलींनाही लग्नासाठी मागणी येत नसल्याने पालकांची चिंता वाढली होती.
