टक्कल व्हायरसनंतर संपूर्ण बुलढाणा जिल्हा ब्ल्यू बेबी सिंड्रोमच्या सावटाखाली आली असल्याची खळबळजनक माहिती समोर आलेली आहे. या गावातील पाण्यात नायट्रेटच प्रमाण पाचपट म्हणजे 54 मिलिग्राम वाढत असल्याने त्यामुळे ब्ल्यू बेबी सिंड्रोमचा धोका वाढलेला आहे. हा आजार झाल्यास बालकांच्या शरीरावरील अवयव क्षमता कमी होते.त्यामुळे या आजाराचा सर्वांधिक धोका चिमुकल्यांना आहे.
गावकऱ्यांनी 8 दिवस अंघोळच केली नाही
advertisement
बुलढाणा जिल्ह्यात सुरूवातीला काहीच गावात नागरीकांना टक्कल पडत होते. मात्र आता या टक्कल व्हायरसची व्याप्ती वाढत चालली आहे. बुलढाण्यातील 11 गावात हा आजार पसरला आहे. बोंडगाव,कालवड,कठोरा,भोनगाव,मच्छीद्रखेड,हिंगणा वैजनाथ,घुई,तरोडा कसबा,माटरगाव, पहुरजीरा,निम्बी या गावांमध्ये टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 104 च्यावर पोहोचली आहे. या घटनेनंतर नागरीकांनी दहशतीमुळे 8 दिवस अंघोळ केली नसल्याची बाब समोर आली आहे.
पिण्यासाठी कोणतं पाणी वापरतात?
या भागातील पाण्याचा स्त्रोत बोअरवेल आणि विहीर आहे. पण हे पाणी वापण्याजोग योग्य नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांनी वान धरणाकडे धाव घेतली आहे.वाण धरण (वारी हनुमान) हे पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवास प्राप्त झाला आहे.त्यामुळे याच पाण्याचा नागरीकांनी पिण्यासाठी तथा वापरण्यासाठी उपयोग करावा, अशा सूचना जिल्हा आरोग्य विभागाकडून नागरीकांना दिला आहे.
