TRENDING:

बुलढाण्यात डोक्याला टक्कल पडणाऱ्याची संख्या वाढली, आकडा गेला 100 वर; गावकरी घाबरले

Last Updated:

बुलढाण्यात 24 तासाच्या आता टक्कल पडलेल्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्याचं समोर आलं आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बुलढाणा  : बोंडगाव,कालवड,कठोरा,भोनगाव,मच्छीद्रखेड,हिंगणा वैजनाथ,घुई,तरोडा कसबा,माटरगाव, पहुरजीरा,निम्बी या गावांमध्ये टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 100 च्यावर पोहोचली आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेत शेगाव तालुक्यात आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.
News18
News18
advertisement

बुलढाणा जिल्ह्यातील सुरुवातीला तीन गावामध्ये टक्कल पडण्याची घटना घडली होती. त्यावेळी 30 रुग्णांना टक्कल पडल्याची बाब समोर आली होती. मात्र आता टक्कल पडत असल्याच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 24 तासाच्या आता टक्कल पडलेल्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्याचं समोर आलं असून आता टक्कर पडणाऱ्याची संख्या 30 वरून थेट 100 वर पोहचली आहे. 11 गावांमध्ये तेथील ग्रामस्थांना केस गळती होत टक्कल पडत आहे त्यामुळे जिल्ह्यातील पुन्हा खळबळ माजली आहे

advertisement

टक्कल पडण्याचे कारण काय?

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगावातील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालंय. गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरतंय. खारबाण पट्ट्यातील या गावात पिण्याची पाण्याची वेगळी सोय केलेली आहे मात्र वापरण्याच्या पाण्यात नाइट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य देखील नसल्याचं धक्कादायक वात्सव समोर आल आहे.

advertisement

गावकरी भयभीत 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

या  आजाराने गावात शिरकाव केल्याने गावकरी चांगलेच भयभीत झाले आहेत. आरोग्य विभागाच्या टीम या गावात दाखल झाले असून सर्वेक्षण देखील सुरू केले

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बुलढाण्यात डोक्याला टक्कल पडणाऱ्याची संख्या वाढली, आकडा गेला 100 वर; गावकरी घाबरले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल