बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील मांडका या गावातील शिवाजी सातव हा युवा शेतकरी त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता.शेतीची की काम करुनच तो आपल्या घराचा गाडा हाकत होता. या दरम्यान त्याला अवैध सावकाराकडून प्रचंड त्रास होता होता. या त्रासाला कंटाळून 27 वर्षीय युवा शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
advertisement
मांडका येथील शिवाजी सातव या युवा शेतकऱ्याने अवैध सावकार विपुल गायगोळ,शुभम गायगोळ यांच्याकडून व्याजाने काही पैसे घेतले होते. मात्र त्याला हे पैसे परत करता आले नव्हते.त्यामुळे त्याने सावकाराकडे आणखी थोड्या दिवसाची मूदत मागितली होती. मात्र सावकाराने कुठल्याही प्रकारची मुदत न देता चक्क शेतकऱ्यांच्या शेतात उभी असलेली म्हैस व्याजाच्या पैश्यात ताब्यात घेतली. त्यामुळे शेतात उभी असलेली म्हैस सोडून नेली त्यामुळे युवा शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.
विशेष म्हणजे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्यांच्या वडिलांनी ही 2006 मध्ये कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली होती.त्यानंतर आता त्याच्या मुलाने अवैध सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
शिवाजी सातव हा घरचा कर्ता पुरुष होता.त्यामुळे त्याच्या आत्महत्येने कुटुंब उघड्यावर पडलं आहे. त्यासोबत अवैध सावकार विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आणि अवैध सावकार हा तलाठीचा पुतण्या असून तलाठ्याचेच पैसे हा अवैध सावकारीतुन वापरत असल्याचा आरोप स्थानिकांमधुन होत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिस काय कारवाई करतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान कर्जबाजारी युवा शेतकऱ्यांच्या त्या कुटुंबियांना सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी आता होत आहे.