TRENDING:

Buldhana News : बुलढाण्याची गर्भवती महिला सोनोग्राफीला आली, स्क्रीनवरचं दृश्य पाहून डॉक्टरही हादरले

Last Updated:

गर्भवती असलेल्या महिलेच्या पोटात दिसलेल्या गोष्टीने डॉक्टरही हादरले आहेत. ही अशी वैद्यकीय स्थिती आहे, जी भारतात आतापर्यंत 10-12 वेळाच आढळली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बुलढाणा : गर्भवती असलेल्या महिलेच्या पोटात दिसलेल्या गोष्टीने डॉक्टरही हादरले आहेत. ही अशी वैद्यकीय स्थिती आहे, जी भारतात आतापर्यंत 10-12 वेळाच आढळली आहे. बुलढाण्याची गर्भवती महिला जेव्हा सोनोग्राफी करायला गेली तेव्हा तिच्या भ्रुणाच्या आतमध्ये भ्रूण आढळलं आहे. सोनोग्राफीच्या स्क्रीनवरचं हे दृश्य पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीनच सरकली. या महिलेचं वय 32 वर्ष आहे. महिलेच्या गर्भामध्ये असलेल्या भ्रुणाच्या आतमध्ये एक भ्रूण दिसलं आहे. ही एक अत्यंत दुर्मिळ घटना असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
बुलढाण्याची गर्भवती महिला सोनोग्राफीला आली, स्क्रीनवरचं दृश्य पाहून डॉक्टरही हादरले (Meta AI Image)
बुलढाण्याची गर्भवती महिला सोनोग्राफीला आली, स्क्रीनवरचं दृश्य पाहून डॉक्टरही हादरले (Meta AI Image)
advertisement

बुलढाण्याच्या जिल्हा रुग्णालयात ही महिला तिच्या नियमित गर्भावस्थेची तपासणी करण्यासाठी आली होती. ही महिला 35 आठवड्यांची गर्भवती आहे. रुग्णालयात महिलेची अल्ट्रासाऊंड तपासणी सुरू असताना चिकित्सकांना असामान्य गोष्ट दिसली, ज्यामुळे त्यांनाही धक्का बसला.

पाच लाखात फक्त एक केस

रुग्णालयातले प्रसुती तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी सांगितलं की, 'हे अत्यंत दुर्मिळ आहे, पाच लाखांपैकी फक्त एका महिलेसोबतच असं होऊ शकतं. आतापर्यंत जगभरात अशा फक्त 200 केस समोर आल्या आहेत, तर भारतात फक्त 10-15 असे प्रकार समोर आले आहेत.'

advertisement

'विकसित होणाऱ्या भ्रुणाच्या पोटामध्ये आणखी एका भ्रुणासारखी संरचना होती, जे असामान्य आहे. या विचित्र प्रकाराची पुष्टी करण्यासाठी आपण रेडियोलॉजिस्ट असलेल्या डॉ. श्रुती थोरात यांचा सल्ला घेतला. त्यांनीही याची पुष्टी केली. या दुर्मिळ प्रकाराने आमच्यासाठीही आव्हान निर्माण झालं आहे', असं डॉक्टर अग्रवाल म्हणाले आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

महिलेची सुरक्षित प्रसुती व्हावी यासाठी तिच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढचे उपचार केले जाणार आहेत. भ्रुणाच्या पोटात भ्रूण असण्याचा हा दुर्मिळ प्रकार समोर आल्यामुळे डॉक्टरही याची सखोल तपासणी करण्याची योजना आखत आहेत, ज्यामुळे भविष्यात असे प्रकार कसे रोखता येतील? आणि कोणत्या उपाययोजना करायच्या? याबाबत माहिती प्राप्त होईल.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Buldhana News : बुलढाण्याची गर्भवती महिला सोनोग्राफीला आली, स्क्रीनवरचं दृश्य पाहून डॉक्टरही हादरले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल