लोणार सरोवराशी कनेक्शन
बुलढाण्यातील आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेतली अन् गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी नागपूरच्या प्रादेशिक प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचबरोबर सात रुग्णांच्या डोक्याच्या त्वचेचे नमुने बायोप्सीसाठी पाठवण्यात आलेत. लोणार येथील सरोवराचे पाणी भूगर्भात मोठ्या प्रमाणात झिरपल्यामुळे त्यातील घटकांमुळे हा आजार होण्याची शक्यता असल्याची देखील चर्चा होत आहे. एका वृत्तवहिनीशी बोलताना वैद्यकीय अधिष्ठातांनी देखील असाच अंदाज वर्तवविला आहे.
advertisement
आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण
बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, मच्छीद्रखेड, हिंगणा वैजनाथ, घुई, तरोडा कसबा, माटरगाव, पहुरजीरा, निम्बी या गावांमध्ये टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 104 च्यावर पोहोचली आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेत शेगाव तालुक्यात आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर टक्कल का व्हावं? यासाठी आम्ही डर्मेटोलॉजिस्ट सर्वे करत आहोत. डर्मेटोलॉजिस्टच हेच म्हणणं आहे, फंगल इन्फेक्शनमुळे हे केस जातायत, असं आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
दिलासा मिळणार का?
दरम्यान, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, साथ रोग अधिकारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी,डर्मोटोलॉजिस्ट, स्किन स्पेशालिस्ट अशी मोठी टीम सध्या बुलढाण्यात काम करत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार का? असा सवाल विचारला जातोय.
लोणार सरोवर
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर (Lonar Sarovar) हे जगप्रसिद्ध सरोवर आहे. हे एक खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली होती. याचे पाणी अल्कधर्मी आहे. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे. मात्र, आता टक्कल पडणाऱ्या आजारात लोणारचं कनेक्शन समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
