नखं कमजोर झाली अन्...
मागील काही दिवसांपासून शेगाव तालुक्यात अज्ञात कारणामुळे अनेक नागरिकांना केस गळतीचा त्रास जाणवत होता. आता या रुग्णांची नखं कमजोर झाली असून ती विद्रूप होऊन गळू लागली आहेत. यामुळे या रुग्णांची चिंता अधिक वाढली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे नागरिक संतप्त झाले असून, त्यांनी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनावर रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला आहे.
advertisement
गंभीर वैद्यकीय समस्येकडे प्रशासनाचं दुर्लक्ष
सुरुवातीला केवळ केस गळतीची समस्या होती, मात्र आता नखं गळती सुरू झाल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. प्रशासनाकडून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही किंवा मदतीचा प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. या गंभीर वैद्यकीय समस्येकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, साथ रोग अधिकारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी,डर्मोटोलॉजिस्ट, स्किन स्पेशालिस्ट अशी मोठी टीम सध्या बुलढाण्यात काम करत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार का? असा सवाल विचारला जातोय.
