TRENDING:

बोगस मतदाराला पळून जाण्यात आमदार पुत्राची मदत, ठाकरेंची शिवसेना जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला

Last Updated:

बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत बनावट मतदारांना रंगेहात पकडण्यात आलं. त्या सर्व संबंधित व्यक्तींकडे आधार आणि मतदान कार्ड सापडल्याने निवडणूक प्रक्रियेतील मोठा घोळ समोर आला असल्याचे जयश्री शेळके म्हणाल्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बुलढाणा: बोगस मतदान प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केली आहे. शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने बोगस मतदाराला पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप आहे.
जयश्री शेळके
जयश्री शेळके
advertisement

बुलढाणा जिल्ह्यात बोगस मतदार प्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या जयश्री शेळके यांनी केली आहे,

अनेक मतदारांच्या नावाने बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्यांचा देखील शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा संपर्कप्रमुख दत्तात्रय लहाने यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे.

advertisement

बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत बनावट मतदारांना रंगेहात पकडण्यात आलं. त्या सर्व संबंधित व्यक्तींकडे आधार आणि मतदान कार्ड सापडल्याने निवडणूक प्रक्रियेतील मोठा घोळ समोर आला आहे. असे बनावट ओळखपत्र बनविणाऱ्यांवर, बोगस मतदार व त्यांना मदत करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी आम्ही करीत आहोत, असे जयश्री शेळके यांनी सांगितले.

आमदार पुत्राची कथित बोगस मतदाराला पळून जाण्यात मदत

advertisement

कथित बोगस मतदाराला नागरिकांनी पकडल्यानंतर आणि चोप देताना आमदार गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी संबंधिताला पळून जायला मदत केली होती. यासंदर्भातील व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले.

24 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सदस्यांची निवडणूक 20 डिसेंबरला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मार्गशिष महिन्यात देवीच्या नैवद्यासाठी खास, बनवा केळीची पुरी, रेसिपीचा Video
सर्व पहा

सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी आता 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बोगस मतदाराला पळून जाण्यात आमदार पुत्राची मदत, ठाकरेंची शिवसेना जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल