TRENDING:

Buldhana : दोघांचाही एकाच श्वासात संपला संसार... प्रेम असावं तर असं की, मृत्यूही वेगळं करु शकला नाही!

Last Updated:

Wife also passed After husband death in Buldhana : बुलढाण्यातील मोतीसिंग परिहार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणांतच त्यांचं निधन झाले. ही दुःखद बातमी त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाईंना समजताच त्यांना मोठा धक्का बसला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल खंदारे, बुलढाणा : बुलडाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील ढोड्रा गावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली (Buldhana Shocking News) आहे. जिथे दोन जीवांचे नाते एकमेकांशिवाय अपूर्ण होते, तिथे मृत्यूनेही त्यांना वेगळे करू शकले नाही. ढोड्रा येथील मोतीसिंग परिहार (वय ७५) आणि त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा परिहार (वय ६५) या दांपत्याने जगाला खरंच दाखवून दिले की प्रेम किती अतूट असू शकते.
wife passed away After her husband death
wife passed away After her husband death
advertisement

पतीचं हृदयविकाराचा झटका

रविवारी सकाळी मोतीसिंग परिहार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणांतच त्यांचं निधन झाले. ही दुःखद बातमी त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाईंना समजताच त्यांना मोठा धक्का बसला. या आघाताने त्यांचेही हृदय थांबलं आणि काही वेळातच त्यांनीही जगाचा निरोप (Wife also passed away After her husband death) घेतला.

advertisement

पत्नीची कायम साथ

परिहार हे आदर्श दांपत्य संपूर्ण गावकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य एकमेकांच्या साथीने व्यतीत केले. मोतीसिंग परिहार हे माळकरी मंडळीचे आधारस्तंभ होते. सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जात असे. त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई यांनीही त्यांना नेहमी साथ दिली.

संपूर्ण गावात शोककळा

advertisement

परिहार दांपत्याच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. दोघांवरही ढोड्रा येथे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अनेक गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. या घटनेने प्रेम आणि निष्ठेच्या एका अनोख्या बंधनाची अखेर झाली, ज्यामुळे संपूर्ण गाव हळहळला.

मृत्यूही तोडू शकत नाही

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

दरम्यान, जिथं दोन जीवांचा संसार एकमेकांशिवाय अपूर्ण असतो, तिथे प्रेमाचा धागा इतका घट्ट असतो की मृत्यूही त्याला तोडू शकत नाही, असं म्हणतात. याचीच प्रचिती बुलढाण्यात आल्याचं पहायला मिळालं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Buldhana : दोघांचाही एकाच श्वासात संपला संसार... प्रेम असावं तर असं की, मृत्यूही वेगळं करु शकला नाही!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल