या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृद्यदावक घटना घडली आहे. दरम्यान दुसरा शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात गंभीर झालेल्या शिक्षकाचं नाव रफीउद्दीन शहाउद्दिन असं आहे . जखमी शिक्षकावर खामगाव येथील रुग्णाल्यात उपचार सुरु आहेत. हे दोघेही शिक्षक पिंपळगाव राजा येथे कार्यरत होते. अपघातानंतर मृतक शिक्षकाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती..
advertisement
नाल्यातून येत होता आवाज; गवत उचलून पाहताच असं काही दिसलं की मेळघाटमध्ये उडाली खळबळ
आज सकाळी शाळेत जाण्यासाठी निघालेले असतानाच ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की इरफान शाह लुकमान शाह यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर डोकं आपटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांनी घटनास्थळीच शेवटचा श्वास घेतला. तर, दुसरा शिक्षक गंभीर जखमी झाला.
ठाण्यात 3 महिन्यात 12 अपघात -
दरम्यान ठाणे घोडबंदर मार्गावर तीन महिन्यात 12 अपघात झाल्याचं समोर आलं आहे. त्यात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, आता तरी बांधकाम विभाग खड्डे भरण्याकडे लक्ष देणार का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डांबरीकरण करण्यात आलं होतं. परंतु ते काम निकृष्ट दर्जाचं केल्यानं पुन्हा रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याचं दिसून येत आहे. रस्त्याच्या वाईट अवस्थेमुळे हा रस्ता प्रवाशांसाठी आता घातक ठरू लागला आहे. मागील तीन महिन्यांत रस्त्यावर 12 गंभीर अपघात घडले असल्याची नोंद काशिगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
