१. मुंबईत होणार I.N.D.I.A ची बैठक, काँग्रेस नेते मुकुल वासनिकांची माहिती
भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी संपूर्ण विरोधी पक्षांनी मोट बांधली असून इंडिया गटबंधन तयार करण्यात आले आहे. या इंडिया गठबंधन ची पटना आणि दिल्लीत बैठक पार पडलेली आहे. आता मुंबईत या इंडिया गठबंधन ची बैठक होणार असल्याची माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार मुकुल वासनिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे मुंबईतील होणाऱ्या या बैठकीत इंडिया गठबंधन मध्ये कोण कोण नेते हजर राहणार याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.
advertisement
2. जिल्हा परिषदची शाळा भरते चक्क गावातील पारावर
मोताळा तालुक्यातील खांडवा येथील जिल्हा परिषदेची शाळा चक्क गावातील हनुमानचे मंदिरात भरत असल्याचा प्रकार समोर आलाय. खांडवा येथील जिल्हा परिषदेची शाळा जुनी झालेली असून शाळेची भिंत पडलीय, तर बाकी भिंतीला तडे गेलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या इमारतीत बसायला भीती वाटते. तर पावसाचेपाणी सुद्धा गळते, परिणामी आता शाळा चक्क हनुमान मंदीरात भरते.
3. राष्ट्रवादी चे आणखी 3 आमदार ही फुटीच्या हुंबरड्यावर खासदार जाधव यांचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी च्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या 105 आमदारांबाबत एक विधान केलं. भाजपच्या १०६ आमदारांबाबत मला दु:ख वाटतं, इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली असेल असं विधान केलं. त्यानंतर शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी त्यांना चांगलेच उत्तर दिलं. अशीच काळजी जर राष्ट्रवादीची केली असती तर 45 आमदार फुटले नसते अस बोलत खासदार प्रतापराव जाधव यांनी सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं. खर तर सुप्रीया सुळे यांच विधान हास्यास्पद असून राष्ट्रवादी चे आणखी 3 आमदार फुटणार असल्याचा गौप्यस्फोट शिंदें गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
4. गुप्तधन शोधणाऱ्या टोळीने ऐतिहासिक मंदिरात खोदले 10 ते 15 फुटाचे खड्डे
बुलढाणा जिल्ह्यातील मा जिजाऊंच्या जन्मगाव असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक ऐतिहासिक वास्तू मोडकळीस आल्या आहेत. त्यातच आता गुप्तधन शोधणाऱ्या टोळीने देखील अनेक ऐतिहासिक वास्तूत खोदकाम केल्याने हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील राजे लखुजीराव जाधव यांचे कुलदैवत असलेल्या शिवणी टाका येथील जगदंबा मातेच्या मंदिरात गुप्तधन शोधणाऱ्या टोळीने तब्बल दहा ते पंधरा फूट खोल असे अनेक खड्डे खोदले आहेत. गुप्तधनाच्या हव्यासापोटी ही टोळी शिवकालीन ऐतिहासिक वारसा नष्ट करून पाहत आहे. मात्र याकडे स्थानिक यंत्रणेचे साफ दुर्लक्ष होत आहे. गुप्तधन शोधणाऱ्या टोळीने मंदिरात केलेल्या या खड्ड्यांमुळे मंदिराचे अस्तित्वच आता धोक्यात आले आहे. त्यामुळे या टोळीचा बंदोबस्त करून कठोर शासन करण्याची मागणी स्थानिक करत आहेत.
5. निळा झेंडा लावला म्हणून गावाने टाकला बौद्ध समाजावर बहिष्कार, गावकरी बसले आमरण उपोषणाला
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील कोलासर गावात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त सरकारी जागेत निळा झेंडा लावल्याने गावातील सवर्णांनी बौद्ध समाजावर सामाजिक बहिष्कार टाकला आहे. गेल्या चार महिन्यांपासून गावकऱ्यांना गावात किराणा, दळण देण्यास मज्जाव केला जातोय. संपूर्ण गावाने गावावर सामाजिक बहिष्कार टाकल्याने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे जातीयवादी लोकांवर कारवाई करावी या मागणीसाठी गावकरी आता उपोषणाला बसले आहेत. त्यात बाबत पोलिसात तक्रार देखील देण्यात आली आहे मात्र त्यावर पोलीस काही बोलण्यास तयार नाहीत.
