TRENDING:

दिवसभर शेतात राबल्या; पण घराची वाट धरताच तिघींना काळाने गाठलं, बुलडाण्यातील हृदयद्रावक घटना

Last Updated:

मृत्यूमुखी पडलेल्या महिला शेतातून काम करून घराकडे निघाल्या होत्या. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बुलढाणा, 06 नोव्हेंबर (राहुल खंडारे, प्रतिनिधी): राज्यातून अपघाताच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. रस्ते अपघातामध्ये अनेकदा लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळेच रस्त्यावर नेहमी वाहनं हळू चालवण्याचा आणि सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. बुलढाणा जिल्ह्यातून अशाच एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.
भीषण अपघातात तिघींचा मृत्यू (प्रतिकात्मक फोटो)
भीषण अपघातात तिघींचा मृत्यू (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदजवळ एका कारने पायी चालणाऱ्या 3 जणांना उडवलं आहे. यात तिन्ही जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या महिला शेतातून काम करून घराकडे निघाल्या होत्या. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. पोलिसांनी घटनास्थळ गाठत कारसह चालकाला ताब्यात घेतलं आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेतले गेले आहेत

advertisement

सूत गिरणीजवळील टर्निंगवर हा अपघात घडला. यात भरधाव कारची धडक इतकी जबर होती, की तिघींचाही जागीच मृत्यू झाला. यात मायलेकीसह एका वृद्ध महिलेनं आपला जीव गमावला आहे. जळगाव जामोद शहरात हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या महिला शेतात कामासाठी गेल्या होत्या. यानंतर शेतातील कामं आटोपल्यावर घरी जाताना त्या रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. इतक्यात एक भरधाव कारने त्यांना चिरडलं.

advertisement

अमरावतीमध्येही भीषण अपघात -

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

अमरावती शहरातील बियाणी चौकात रेतीचा ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली होती. या अपघातात सहाय्यक पोलीस अधिकारी प्रियंका कोटावार यांचा डावा पाय निकामी झाला. हा अपघात इतका भयानक होता की पायाचा चुरा झाला. घटनेनंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. महिला पोलीस अधिकारी प्रिंयका कोतावार ह्या आपल्या कर्तव्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात जात असताना हा अपघात घडला. अमरावती शहरात गौण खनिजांच्या ट्रकची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरू आहे. या घटनेनंतर या अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला .

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
दिवसभर शेतात राबल्या; पण घराची वाट धरताच तिघींना काळाने गाठलं, बुलडाण्यातील हृदयद्रावक घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल