बुलढाणा : समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे चर्चेत राहिला आहे. आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण असा अपघात झाला आहे. धावत्या ट्रकला मागून इंडिगो कारने धडक दिल्यानं तिघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती समजते. मृतांमध्ये पती-पत्नी आणि एका मुलाचा समावेश आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर ट्रकला धडक दिल्यानं इंडिगो कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. राजेश दाभाडे, शुभांगी दाभाडे आणि रिहाश दाभाडे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
advertisement
इंडिगो कार पुण्याहून अमरावतीच्या दिशेने जात होती. त्यावेळी सिंदखेडराजा तालुक्यातल्या पिंपळखुटा शिवारात हा अपघात झाला. अपघातात तिघे जण जागीच मृत्यूमुखी पडले. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे.
