समाधान खिल्लारे (वय 55) असे आज शनिवारी सकाळी आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब सकाळी उघडकीस आली. याआधी शुक्रवारी सूतगिरणी परिसरात आत्महत्या करणाऱ्या गोपाळ खिल्लारे याचे ते वडील होत. गोपाळ खिल्लारे (ववय 22 वर्षे) आणि तेरा वर्षीय साक्षी संतोष अंभोरे यांनी शुक्रवारी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यापाठोपाठ वडील समाधान खिल्लारे यांनीही गळफास घेतला.
advertisement
बदनामीच्या भितीने उचललं पाऊल
गोपाळ खिल्लारे या मुलाने आपल्या अल्पवयीन प्रेयीसीसोबत झाडाला एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली होती. त्याचा धसका घेत त्याच्या वडिलांनी समाधान खिल्लारे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. समाजात बदनामी होईल आणि संभाव्य कारवाईचा धसका घेत त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
वाशिम जिल्ह्यातही अशीच घटना
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातही एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन जीव संपल्याची घटना घडली होती. जऊळका पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या उमदरी वनपरिक्षेत्रात ही घटना घडली. वृत्तानुसार हे दोघेही वाशिम जिल्ह्यातील असून गेल्या काही वर्षांपासून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, दोघांच्याही प्रेमाला कुटुंबियांचा विरोध होता. वारंवार विनंती करून सुद्धा कुटुंबीय त्यांच्या प्रेमाची मागणी मान्य करत नसल्याने हे दोघांनाही घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या दोघांचा मृतदेह आढळून आलेत. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे.
