परिवर्तन आघाडीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. पुण्यात बैठक देखील झाली. मात्र आता दुसरीकडे रविकांत तुपकर हे पुण्यात स्वतंत्र बैठक घेणार आहेत. येत्या 24 जुलैला रविकांत तुपकर यांची पुण्यात बैठक पार पडणार आहे. शेतकरी चळवळीची पुढील दिशा ठरविण्यासंदर्भात तुपकर यांनी ही राज्यस्तरीय महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पुन्हा एकदा तुपकर शेट्टी वाद उघड झाला आहे.
advertisement
छोट्यामोठ्या संघटना एकत्र करून त्यांची मोट बांधत परिवर्तन आघाडी निर्माण करण्यासाठी राजू शेट्टी यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांची पुण्यात बैठक देखील पार पडली. मात्र आता तुपकर देखील पुण्यात बैठक घेणार आहेत.
Location :
Buldana,Buldana,Maharashtra
First Published :
July 19, 2024 9:30 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
परिवर्तन आघाडी होण्याआधीच धुमशान, राजू शेट्टी-तुपकरांमधला वाद मिटेना
