या घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड हे आपल्या वाहनाच्या ताफ्यासह मेहकरमध्ये दाखल झाले. त्यांनी मेहकर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाणेदारांची भेट घेतली. तसेच झालेल्या प्रकाराबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. पोलिसांकडून संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र तरी देखील संजय गायकवाड यांचा राग शांत झालेला नाही. माझा हिशोब बाकी आहे, त्यांना जामीन मिळाल्यावर एकाएकाला फोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला आहे,
advertisement
नेमकं काय घडलं होतं?
मेहकर शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने धार्मिक कारणावरून राडा घातला. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसमोर फटाका फोडला, तिची छेड काढली. तिला वाचवायला आलेल्यांना देखील लाठी-काठीसह दगडांनी मारहाण करण्यात आली होती.
Location :
Buldana,Buldana,Maharashtra
First Published :
November 14, 2023 3:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
'अजून हिशोब बाकी, एकएकाला फोडल्याशिवाय राहणार नाही'; संजय गायकवाड का संतापले?
