पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करा
पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती आणि बुलढाणा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याची तक्रार केली आहे. सोबतच जळगाव जामोद पोलिसांचा तपास हा संशयास्पद असून जळगाव जामोद पोलिसांवर माझा विश्वास नाही अस स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे माझ्या पत्नीच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन गंभीर वळण मिळाल आहे. पंकज देशमुख हा गेल्या 22 वर्षापासून भाजप कार्यकर्ता व जळगाव जामोद चे भाजपा आ. संजय कुटे यांचा वाहन चालक असल्याने त्यामुळे सुनिता देशमुख यांना नेमका कुणावर संशय आहे? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement
बुलढाण्यात मस्साजोग..?
जळगाव जामोद पोलिसांवर सुनीता देशमुख यांचा विश्वास का नाही? पंकज देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याचं सुनीता देशमुख यांना का वाटतं? असे अनेक प्रश्न आता उपस्थित राहिले आहे. अलीकडेच बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता बुलढाण्यातही तसेच काही घडतं आहे का? याचा शोध घेण्याचं आव्हान आता बुलढाणा पोलिसांसमोर आहे.
मृतकाच्या पत्नीची मुख्यमंत्री यांना भावनिक पोस्ट
भाजपा कार्यकर्ता आणि आ. संजय कुटे यांचे वाहनचालक असलेल्या पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी पत्नी सुनीता देशमुख यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना उद्देशून भावनिक पोस्ट लिहिली आहे. मुख्यमंत्री साहेब पहेलगामच्या भगिनिंच कुंकू पुसल म्हणून "ऑपरेशन सिंदुर " राबवलं. इथे भाजपा कार्यकर्त्यांच्या पत्नीचं सिन्दुर दररोज पुसल्या जातंय त्यासाठी काय करणार? असा सवाल सुनीता देशमुख यांनी विचारला आहे.
