घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नांदुरा अर्बन बँकेचा कनिष्ठ संगणक अधिकारी गजानन शर्मा यानं बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे. त्याने इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं बँकेतील तब्बल पाच कोटी 45 लाख रुपयांची रक्कम इतर बँकांच्या विविध खात्यात ट्रान्सफर केली. ही बाब बँकेच्या संचालकांच्या लक्षात येताच शर्मा यांच्याविरोधात नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून शर्मा याला अटक केली आहे.
advertisement
ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण
दरम्यान ही बातमी समोर आल्यानंतर ठेवीदारांमध्ये भीतीनं वातावरण पसरलं असून, ठेविदारांनी बँकेत गर्दी केली, घडलेल्या प्रकारानंतर यावर बँक व्यवस्थापनाच्या वतीनं प्रतिक्रिया देण्यात आली आहे. कोणीही घाबरून जाऊ नये, ठेवीदारंच्या ठेवी सुरक्षीत असल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला आहे.
