प्रायव्हेट पार्ट देखील कापला
जुन्या वादातून हे हत्याकांड घडवलं गेलं असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जातोय. माजी सरपंच अशोक सोनुने यांच्या जीवाला धोका असल्याबाबत अनेक वेळा लोणार पोलिसांना कळवलं होतं तरी देखील पोलिसांनी याची दखल घेतली नसल्याने हे हत्याकांड घडलं आहे. त्यानंतरही अजूनही या प्रकरणात सर्व आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला जातोय. हे प्रकरणातील फरार आरोपी मोकाट असल्याने पीडित कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच मुंडक कापून दोन्ही हात कापत प्रायव्हेट पार्ट ही कापला गेला, असा गंभीर आरोप मृतकांच्या मुलाने केला आहे.
advertisement
पोलीस प्रशासनाला जाग कधी येणार?
पीडित कुटुंबीयातील आणखी काही लोकांचे जीव गेल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग येणार आहे का असा संतप्त सवाल भाई दीपक केदार यांच्याकडून उपस्थित केला जातोय. पीडित कुटुंबियांनी पॅंथर सेनेच्या दीपक केदार यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली आहे. पॅंथर सेनेचे दीपक केदार यांनी या प्रकरणात आता उडी घेतली आहे.
पोलिसांची भूमिका संशयास्पद
या घटनेला देखील आता महिना लोटत असून अद्यापही आरोपी मोकाट असल्याने संता व्यक्त केला जातोय. पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जुन्या वादातून हे हत्याकांड घडवलं गेलं असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जातोय.. माजी सरपंच अशोक सोनुने यांच्या जीवाला धोका असल्याबाबत अनेक वेळा लोणार पोलिसांना कळवलं होतं तरी देखील पोलिसांनी याची दखल घेतली नसल्याने हे हत्याकांड घडलं आहे. त्यानंतरही अजूनही या प्रकरणात सर्व आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला जातोय.
पीडित कुटुंबीयांच्या जीवाला धोका
दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपी मोकाट असल्याने पीडित कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पीडित कुटुंबीयातील आणखी काही लोकांचे जीव गेल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल भाई दीपक केदार यांच्याकडून उपस्थित केला जातोय.