मुलींच्या रडण्याचा आवाज अन्...
कांचन अमोल सोनुने असे या मृत महिलेचे नाव असून तिने ३ वर्षांची आकांक्षा आणि केवळ ६ महिन्यांची प्रांजल यांना मृत्यूच्या दारात ढकलले होते. घरातील अँगलला तिघींना लटकवल्यानंतर मुलींच्या रडण्याचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी धाव घेतली. दरवाजा तोडून आत पाहिले असता कांचन मृतावस्थेत होती, तर मुली खाली पडलेल्या आढळल्या. त्यांच्या गळ्यावर फासाचे वळ असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
advertisement
चारित्र्यावर संशय घेऊन माहेरून पैशांची मागणी
या आत्महत्येमागे सासरच्या मंडळींकडून होणारा छळ कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. 'वंशाचा दिवा दिला नाही' असे म्हणून कांचनला सतत हिणवले जात होते. तसेच चारित्र्यावर संशय घेऊन माहेरून पैशांची मागणी केली जात होती. गरीब परिस्थितीमुळे ही मागणी पूर्ण करू न शकल्याने कांचनचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असे, अशी तक्रार तिच्या आईने लोणार पोलीस स्टेशनला दिली आहे.
नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी कांचनचा पती अमोल सोनुने, सासरा विश्वनाथ सोनुने आणि इतर नातेवाईकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. लोणार पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.
