पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे चौघेजण दोन लाखाच्या मोबदल्यात चार लाख रुपये देण्याचे आमिष देऊन फसवणुकीच्या तयारीत होते. मात्र, वेळीच पोलिसांनी या चौघांना रंगेहाथ पकडून अटक केली आहे. हे चौघेही आरोपी खामगाव शहरातील रहिवासी असून यामध्ये सचिन भास्कर दुतोंडे (वय 34,राहणार बर्डे प्लॉट) मयूर किशोर सिद्धपुरा (वय 34), विलास बाबुराव ठाकरे (वय 38), लखन गोपाल बजाज (वय 33 वर्ष सर्व राहणार अभय नगर दंडे स्वामी मंदिराजवळ घाटपुरी नाका) यांचा समावेश आहे. या चौघांकडून एक टाटा हरिअर कार आणि भारतीय बच्चो का बँक असे लिहिलेल्या पाचशेच्या सहा हजार शंभर नोटा, खऱ्या 500 च्या 849 नोटा आणि सहा अँड्रॉइड फोन जप्त केले आहेत. गुन्हा करण्याच्या उद्देशाने या चौघांनी कारला बनावट नंबर प्लेट देखील लावली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
advertisement
वाचा - 'टकिलाचे काही शॉट्स घेतले अन्', तरुणीने इन्स्टाग्रामद्वारे फोडली अन्यायाला वाचा
यापूर्वीही महाराष्ट्रात बनावट नोटांचं रॅकेट उघड
दोन महिन्यांपूर्वी एनआयएने महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील राहुल तानाजी पाटील उर्फ जावेद आणि शिवा पाटील भीमराव, उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील विवेक ठाकूर उर्फ आदित्य सिंग, कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील महेंद्र यांच्या घरांवरही छापे टाकले होते. राहुल तानाजी पाटील बनावट पत्त्याचे सिमकार्ड वापरून बनावट नोटा पुरवत असल्याचे तपासात उघड झाले होते. आता पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यात बनावट नोटांचे रॅकेट सापडल्याने खळबळ उडाली आहे.
