विद्यार्थिनीला मलकापूर तहसील चौकात बोलावलं
आरोपी शिक्षकाचे नाव मुकेश परमसिंग रबडे (वय 40) असून, तो मोताळा तालुक्यातील रहिवासी आहे. पीडित विद्यार्थिनी त्याला ओळखत होती. प्रॅक्टिकलचे गुण वाढवून देण्याचे तसेच अभ्यासाचे काही साहित्य देण्याचे आमिष दाखवून आरोपीने 28 ऑक्टोबर रोजी 16 वर्षीय पीडित विद्यार्थिनीला मलकापूर तहसील चौकात बोलावून घेतले.
मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून...
advertisement
तहसील चौकातून त्याने मुलीला एका रूमवर नेले. तिथे नेऊन आरोपी शिक्षकाने जबरदस्तीने मुलीवर अत्याचार केला. या गुन्ह्यामध्ये त्याने पीडितेच्या मैत्रिणीचाही वापर केला. त्याने तिच्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून सुरू असलेल्या अत्याचाराचे रेकॉर्डिंग करण्यास सांगितले आणि तिने त्याप्रमाणे चित्रण केले. अत्याचाराला विरोध करणाऱ्या पीडितेला आरोपीने मारहाण देखील केली होती.
16 वर्षीय मैत्रिणीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल
नंतर याच शिक्षकाने पीडितेशी पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यानंतर, पीडितेच्या मैत्रिणीने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ व्हायरल केला, ज्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मलकापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिक्षक मुकेश रबडे आणि गुन्ह्यात सहभागी असलेल्या 16 वर्षीय मैत्रिणीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
