TRENDING:

Buldhana Crime : हसतं खेळतं कुटूंब उद्धवस्त! पतीने झापेतच पत्नीला संपवलं, 4 वर्षाच्या पोटच्या मुलावर कुऱ्हाडीने सपासप वार

Last Updated:

Buldhana Father brutally killed Son : बुलढाणा जिल्ह्यात पतीने गाढ झोपेत असलेल्या आपली 30 वर्षांची पत्नी रूपाली आणि अवघ्या 4 वर्षांचा निरागस मुलगा रियांश यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यातून एक अस्वस्थ करणारी घटना समोर आली असून, मेहकर शहरात रविवारी उत्तररात्री रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडला. कौटुंबिक वादाचे रुपांतर एका भीषण कृत्यात झालं असून, यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरला आहे. डोक्यातील संशयाच्या भूतामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा अंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Buldhana Father brutally killed Son
Buldhana Father brutally killed Son
advertisement

कुऱ्हाडीने सपासप वार

चारित्र्याच्या संशयावरून राहुल हरी म्हस्के या 35 वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरी अत्यंत क्रूर पाऊल उचलले. त्याने गाढ झोपेत असलेल्या आपली 30 वर्षांची पत्नी रूपाली आणि अवघ्या 4 वर्षांचा निरागस मुलगा रियांश यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. डोक्यावर वर्मी घाव बसल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. आवाजामुळे राहुलच्या आईला जाग आली आणि त्यांनी आरडाओरड केली, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

advertisement

पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

गंभीर जखमी झालेल्या रूपालीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चिमुकल्या रियांशचाही या हल्ल्यात जीव गेला. या प्रकरणी मृत रूपालीचे वडील भास्कर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मेहकर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

advertisement

विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाढला सोयाबीनचा भाव, तूर आणि कापसाची स्थिती काय?
सर्व पहा

दरम्यान दुसरीकडे, बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपूर येथून जवळच असलेल्या भानापूर येथील सुशिक्षित तरुण शेतकरी अर्जुन कचरुबा आव्हाळे (वय वर्ष 35) यांनी आर्थिक विवंचना आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची ह्रदय द्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana Crime : हसतं खेळतं कुटूंब उद्धवस्त! पतीने झापेतच पत्नीला संपवलं, 4 वर्षाच्या पोटच्या मुलावर कुऱ्हाडीने सपासप वार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल