बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे महिला मुलींशी अश्लील वर्तन करून छेडछाड करणाऱ्या एका व्यक्तीला महिलांनी चांगलाच चोप देऊन त्याला चपलेचा हार घातल्याची घटना घडली. याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा व्यक्ती बुलढाण्याच्या शेगाव शहरातील असून त्याचे नाव ज्ञानेश्वर कुकडे असे आहे. आरोपीचे शहरात गुरुदेव मोटार ड्रायव्हिंग स्कूल असून त्या ठिकाणी येणाऱ्या महिला मुलींशी हा व्यक्ती अश्लील वर्तन करून छेडछाड करत होता. मात्र भीतीपोटी महिला मुली समोर येत नव्हत्या. एका पीडित मुलीने काही महिलांसह त्याला भर रस्त्यात चोप दिला. नंतर चपलेचा हार घालून पोलीस स्टेशनपर्यंत नेले. हा प्रकार घडतेवेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती.
advertisement
वाचा - लग्नाच्या तगाद्याला वैतागला; तरुणानं प्रेयसीचाच केला गेम; आरोपीला अटक
मिरजेत तरुणीने कपडे फाटेपर्यंत धुतलं
29 जानेवारी 2024 ला सकाळी एका तरुणीने रोडरोमिओची भररस्त्यात मारहाण करत पोलीस स्टेशनपर्यंत धिंड काढल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. भर रस्त्यावर मारहाण करत तरुणाला धडा शिकवणाऱ्या या तरुणीचं कौतुकही होत आहे. आरोपी तरुण हा चायनीज गाड्यावरील कामगार आहे. त्याने या तरुणीचा छेड काढल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. छेड काढल्याने संतापलेल्या तरुणीने तिथेच तरुणाला मारायला सुरुवात केली. पोलीस स्टेशनपर्यंत तरुणाला मारहाण करीत त्याची धिंड काढली. हा सर्व प्रकार रस्त्यावरील दुकानांच्यावर लावण्यात आलेल्या सी.सी.टीव्ही मध्ये कैद झाला आहे. मिरज शहर पोलीस ठाणे येथे सदर प्रकरणाची अद्याप तरी नोंद झाली नसल्याचे समजते. परतु, या घटनेने टवाळखोर तरुणांवर या घटनेने जबर वचक बसणार आहे.
